ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या “मिश्किली आणि गप्पा” कार्यक्रमास प्रतिसाद

कवी अशोक नायगावकरांच्या मिश्किली आणि गप्पात महिला दिन साजरा

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांचा मिश्किली आणि गप्पा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यानगर येथे शनिवारी ( दि. ८ मार्च रोजी) हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांनी महिलांवरील विविध कवितांचे सादरीकरण केले.  स्वयंपाक घरातील गृहिणी ते विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेली महिला अशा सर्वच स्तरावर आधारित कवितांचे सादरीकरण करून नायगावकरांनी हास्याचे फवारे उडवले, त्याला उपस्थित महिलांनीही मोठी दाद दिली.

प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागावकर यांनी केले.  त्यांनी महिला दिन साजरा करताना महिलांसाठी कवितांचा कार्यक्रम करण्यामागचा हेतू आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या कार्याचा आढावा  मांडला.   सूत्रसंचालन मसापच्या पृथा हलसगीकर, आभार प्रदर्शन मेधा कुलकर्णी यांनी  केले.   अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या उपनगरीय शाखेचे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय साळुंखे यांचा कवी अशोक नायगावकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, जितेश कुलकर्णी, अमोल धाबळे, विनायक होटकर, वर्षा कत्ते, नसीमा पठाण, आण्णासाहेब कोतली, मोहन सोनी, पद्माकर कुलकर्णी, गिरीश दुनाखे, मारुती कटकधोंड, रसिका बडवे, विशाखा कुमठेकर, उर्मिला जोशी, कृपाताई देशमुख, वंदना ताटे, विजय शिंदे, अनुजा पत्की, मृणाल पत्की, आशा जाधव, नीता जेऊरकर, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *