पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांचा वारसा जपणाऱ्या खेळाडूंसह ६० मान्यवरांचा सन्मान सोहळा कन्या फाऊंडेशनचा उपक्रम

पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांचा वारसा जपणाऱ्या खेळाडूंसह ६० मान्यवरांचा सन्मान सोहळा
कन्या फाऊंडेशनचा उपक्रम

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांचा वारसा जपणाऱ्या 35 खेळाडूंसह समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ६० मान्यवरांचा आदर्श पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले. हा कार्यक्रम जुना विडी घरकुल येथील कै. प्रकाश तुकाराम सोमा सभागृह, जुना विडी घरकुल, एच ग्रुप, हैदराबाद रोड, सोलापूर येथे पार पडला.
योंगमुडो, दांडपट्टा, लाठी-काठी या खेळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षक, मागर्दर्शक यांच्यासह 35 हून अधिक महिला खेळाडूंचा आदर्श-सर्वोत्कृष्ट खेळाडू, आदर्श प्रशिक्षक, मार्गदर्शक तसेच समाजात विविध क्षेत्रात समाजोपयोगी, विधायक कार्य करणाऱ्या २५ हून अधिक असे ६० मान्यवरांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रुद्रशक्ती गुरुकुल शिवकालीन मर्दानी व क्रीडा प्रशिक्षण केंद्र, विडी घरकुल येथील महिला खेळाडूंच्या वर्षभरातील अप्रतिम कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम कन्या फाऊंडेशनने धनश्री विविध विकास संस्था, रुद्रशक्ती गुरुकुल शिवकालीन मर्दानी व क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि योंगमुडो असोसिएशन यांच्या विद्यमाने आयोजित केला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कन्या फाऊंडेशनच्या प्रमुख योगिता मठपती, धनश्री विविध विकास संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ स्वामी, दैनिक तरुण भारतचे माजी संपादक (ज्येष्ठ पत्रकार) विजयकुमार पिसे, योंगमुडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सरचिटणीस नागेश शेट्टीकर, रुद्रशक्ती गुरुकुल शिवकालीन मर्दानी व क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षा संगिता फुलारी, उपाध्यक्षा रोहिणी भुसारे, सचिवा संजना मिस्कीन, समाजसेवक हरीश सोमा, मीनाक्षी सोमा, मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन, साक्षी कानगुडे, पूजा शेट्टीकर, बसवराज मठपती, रोटरी क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष जी.एस.पाटील,भारती विद्यापीठ समाजकार्य विभागाचे माजी संचालक डॉ. प्रा. जयश्री मेहता, प्रा. रोहिणी पावडशेट्टी, बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव प्रमोद काटे, गोरख गडसिंग यांच्यासह विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


+++++++++++++++++++++++++++
आत्मसंरक्षणाची “दुर्गाशक्ती” पारंपारिक खेळांच्या माध्यमांतून मिळते : विजयकुमार पिसे
दांडपट्टा, लाठी-काठी यासारख्या पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांचा वारसा जोपासणाऱ्या “कन्या” अर्थात ज्यांना आपण दुर्गा म्हणू यात. अशा या कन्या दुर्गाशक्तीच्या माध्यमांतून स्वतःसह समाजाचे संरक्षण करू शकतात. त्या सक्षम आहेत. अशा या स्वतःचे आत्मसरंक्षण करण्यात सक्षम असणाऱ्या दुर्गाशक्ती , मातृशक्ती यांच्याकडे कोणीही वाकडे नजरेने पाहू शकणार नाहीत. अशा प्रकारचे दुर्गाशक्तीचा सन्मान सोहळा कार्यक्रम कन्या फाऊंडेशनचे हे स्तुत्य उपक्रम आहे., असे प्रतिपादन तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांनी केले. ते कन्या फाऊंडेशनच्यावतीने पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांचा वारसा जपणाऱ्या खेळाडूंच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
मुली आणि महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी दांडपट्टा, लाठी-काठी यासारख्या पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांची सध्या समाजाला अतिशय गरजेचे आहे. अशा या मैदानी खेळांच्या माध्यमांतून प्रशिक्षण, कौशल्य, आत्मसंरक्षणासाठी स्वयंशक्तीची, जाणीव करून देणे खऱ्या अर्थाने आज समाजाला गरज आहे. आत्मसंरक्षणाची जी शक्ती आहे ती अशा प्रकारच्या पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांच्या माध्यमांतून मिळत असते. अशा शक्तीची आपल्याला गरज आहे. मुलीना आत्मसंरक्षणाची धडे देणाऱ्या अशा प्रकारचे प्रशिक्षण शहरातील अन्य भागातही उभारावेत.
===============================================================

या मान्यवरांचा झाला सन्मान :
मीनाक्षी हरीष सोमा,हरीष प्रकाश सोमा, विवेक विजय मिस्कीन, संगिता योगिनाथ फुलारी, रोहिणी तुकाराम भुसारे, संजना विवेक मिस्कीन, नागेश शशिकांत शेट्टीकर, जी.एस.पाटील, सोनाक्षी मोहन माडे, पूजा नागेश शेट्टीकर, भावना अजय गड्डम, स्वप्नाली नृसिंह जमादार, दर्शनी संतोष सोमा,श्रद्धा दीपक इप्पनपल्ली, गौरी गिरीराज माळी, वेदश्री अमरनाथ गुडूर, प्रवलिका मोहन कामुर्ती, जानवी मल्लिकार्जुन म्हेत्रे, बिंदूप्रिया भास्कर कुने,वैभवी शिवानंद आळगुडगी, तेजल अंबादास रच्चा, मान्यता देविदास रोहिटे, संध्या सोमण्णा पुजारी, श्रद्धा तानाजी सरवदे, ममता नागनाथ अलशेट्टी, आदिती नंदकुमार नल्ला, पल्लवी सिद्राम बिनगुंडी, भविष्या सतीश सिंदम, आराध्या बसवराज मसरेड्डी, नव्या राजेश कुस्मा, कोमल कृष्णा मनीकोंडा, श्रावणी सुनील गवळी, साक्षी शशिकांत कानगुंडे, मोनिका नागेश कसबे, ममता चंद्रशेखर मंडल, सुरेश कागे, सुनिता सुरेश कोरे, डॉ. जयश्री मोहनदास मेहता, रोहिणी गणेश पावडशेट्टी, प्रमोद बलभीम काटे, गोरख गडसिंग, दीपक अशोक गुंजे, अब्दुल्ला अलिसाब चौधरी, निलेश बाबूराव गायकवाड, विजयकुमार पिसे, मुक्ताजी शहाजी कांबळे, कृष्णपरमेश्वर सिद्धप्पा सुतार, गौरीशंकर बनसिद्ध नारायणे, सचिन धुळाजी जाधवर,अलका विष्णू कांबळे, स्नेहल दादासाहेब खराटे, अंजली शिवाजी नागणे, सीमा सुनील जाधव, मेनका रवींद्र चव्हाण, शिल्पा नागराज यावगल, लक्ष्मी राजेश भिमर्थी, सीमा श्रीकांत कोरोलीकार,रेश्मा अमित सावंत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *