हॉकीपटूसाठी आनंदाची बातमी; सोलापुरात हॉकी खेळाचे प्रशिक्षण सुरु

सोलापुरातील तीन केंद्रांवर मिळणार तंत्रशुद्ध हॉकीचे धडे; जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रामार्फत हॉकी या खेळाचे प्रशिक्षण केंद्र जिल्हा क्रीडा संकुल (कुमठा नाका सोलापूर), इंडियन मॉडेल स्कूल व सहस्त्रार्जून हायस्कूल सोलापूर येथे सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिली.

        प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी खेळाडूंना तंत्र शुध्द मार्गदर्शन देण्यासाठी हॉकी या खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती वैशाली सुळ हे प्रशिक्षण देणार असून ज्या विदयार्थी व  खेळाडूंना प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत  वैशाली सुळ (मो.नं. ७४४७४९१८८८) यांच्याकडे नोंदवावीत. 

सदर प्रशिक्षण केंद्र नियमितपणे सुरु असून, प्रशिक्षणाची वेळ सकाळी ६.३० ते ९.३० वाजता व सायकांळी ४.०० ते ६.३० वाजता अशी आहे. तरी विदयार्थी व खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *