सकल जैन समाजाचे अध्यक्ष हर्षवर्धन शहा यांचे निधन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर सकल जैन समाजाचे अध्यक्ष, श्राविका संस्थेचे सचिव व आस्था सामाजिक संस्थेचे माजी अध्यक्ष हर्षवर्धन रतनचंद शहा (निंबर्गीकर) यांचे गुरुवार दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७७ वर्षांचे होते.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ११.३० वाजता सम्राट चौक येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर जुना कारंबा नाका, सम्राट चौक येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.