ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी; उत्तरचे हसीलदार निलेश पाटील यांचे आवाहन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : शासनाच्या विविध कृषीसंलग्न योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने व अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. उत्तर सोलापूर तालुक्यामधील सर्व गावामध्ये ॲग्रिस्टॅक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची कार्यवाही सुरु आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करण्याचे आवाहन तहसीलदार निलेश पाटील यांनी केले आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात गावातील ग्राम महसूल अधिकारी यांना दि. ४ व ५ फेब्रुवारी २०२५ या दोन दिवसामध्ये गावातील सीएस (CSC) चालक व महा-ई-सेवा चालक यांना सोबत घेऊन मोहीम स्वरुपात ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक काढले जाणार आहेत. आपल्या गावच्या ग्राम महसूल अधिकारी यांना दि. ४ व ५ फेब्रुवारी २०२५ या दोन दिवशी गावामध्ये उपस्थित राहून सदरचे कामकाज मोहीम स्वरुपात करण्याच्या सूचना या कार्यालाकडून दिलेल्या आहेत.
सर्व शेतकरी यांनी आपले आधारकार्ड (मोबाईक नंबर लिंक असलेले) घेऊन आपले गावचे ग्राम महसूल अधिकारी, सीएस (CSC) चालक व महा-ई-सेवा चालक यांच्याशी संपर्क साधून शेतकरी ओळख क्रमांक तयार करुन घ्यावा, असे आवाहनही तहसीदार पाटील यांनी केले आहे.