सोलापुरातील बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी !

१ हजार ३७४ हून अधिक रिक्तपदे; १३ उद्योजकांनी घेतला पुढाकार

  • सहायक आयुक्त संगिता खंदारे यांची माहिती ; गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरी इच्छूक बेरोजगार उमेदवारांसाठी गुरूवार, दि. ३० जानेवारी २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय (अल्पसंख्यांक विशेष) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूरचे सहायक आयुक्त संगिता खंदारे यांनी दिली आहे.

 या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आ.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीयन, मशीन ऑपरेटर, बी.कॉम अशा प्रकारची एकूण १ हजार ३७४ पेक्षा अधिक रिक्तपदे १३ उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी बायोडेटांच्या तीन प्रती आणि कागदपत्रासह गुरुवार, दि. ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत “ अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, ६८ आदर्श नगर, कुमठा नाका, सेालापूर ” येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (०२१७-२९९२९५६) या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूरचे सहायक आयुक्त संगिता खंदारे यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *