क्राईम वाढले की राव?

Vlog-1

क्राईम वाढले की राव?

समाजाला दिशा देण्याची गरज

दिवसेंदिवस क्राईम अर्थात गुन्हेगारी वाढतच चालले आहे. जरी ही एक समाजासाठी चिंतेची बाब असली तरी क्राईम हे पूर्वीपासून चालतच आलेले आहे. मात्र याचे प्रमाण कमी अधिक होत असते, एवढेमात्र खरे.

याची कारणे अनेक होऊ शकतात. क्राईम वाढण्याचे पहिले महत्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे अर्थकारण. दुसरे कारण म्हणजे मानसिक विकृती. याला जोड मिळत असते ते पूर्ववैमानष्य याचे. मागील भांडणाचा रोष, पुरानी दुश्मनी, वाद-बाचाबाची यावरूनही अनेकदा भांडणतंटे होतात, याचे परिणाम स्वरूप म्हणजे खून खराब्यात होते. हे स्पष्ट आहे. आणखी एक कारण म्हणजे लफड. अनैतिक संबधातून अनेकदा अनेकांचे बळी गेल्याचे आपण पाहतोय.

क्राईम अर्थात गुन्हेगारी वाढण्याच्या पाठीमागे  हल्लीची कारणे मात्र वेगळीच दिसून येत आहेत. हे एक पोलीस प्रशासनासह समाजासमोर एक मोठे आव्हान उभे पाहत आहे. होय खरंय, मानसिकता बदलली आहे. सामाजिक परिस्थिती बदलत चालली आहे. याला राजकीयदेखील तितकेच जबाबदार ठरत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण हल्ली आपण पाहतोय, मतांच्या राजकारणासाठी विविध पक्ष आणि पक्षांचे नेतेमंडळी समाजासमोर एक मोठे आवाहन उभे करू पाहत आहेत. होय आवाहनच, म्हणावे लागेल. कारण सध्या हे पक्ष आणि ती नेतेमंडळी समाज, समाजातील नवीन, तरुण पिढीला एक वेगळा असा मार्ग दाखवू पाहत आहेत, ते म्हणजे समाजमन आणि हल्लीची युवापिढी मानसिकदृष्ट्या विकलांग झालीय. अर्थात तरुणपिढी आता आळशी बनू पाहतेय. समाज आणि या युवापिढीला आळशी बनवू पाहणाऱ्या या राजकारणातील  नव्या ट्रेंडमुळे समाज आणि युवापिढीची मानसिकता बदलू पाहत आहे.  जाणूनबुझून असा एक नवा ट्रेंड युवापिढीसमोर ठेऊ पाहणाऱ्या या वृत्तीला वेळीच आवर घालणे अथवा रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी राहणार आहे. पण असे करणार कोण? याला प्रतिबंध करणार कोण? रोखणार कोण? कारण कुंपणच शेत खाते अशी सध्या परीस्थिती आहे.  कारण यासाठी पुढाकार घ्यावा लागतो. कोणीतरी स्वयंस्फुर्तिनी पुढे यावे लागणार आहे. यासाठी समाजाला एका नव्या उत्क्रांती घडवू पाहणाऱ्या नेतृत्वाची खरी गरज आहे. समाजाला एक दिशा देण्याची गरज आहे.

वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, ऐन तारुण्यपणीच वाढलेला आळशपणा आणि आळशीवृत्ती अशा प्रकारच्या सर्व विकृतींनी समाज आणि युवापिढी ग्रासलेली आहे. हीदेखील एक प्रकारचा क्राईमच नव्हे का? एक मानसिक गुन्हेगारीच म्हणावी लागेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *