केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे…
केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे. काम कर प्यारे, मेहनत कर प्यारे..! अशी म्हणण्याची सध्या वेळ तरी आली नाही? यावर थोडेसे भाष्य करावेसे वाटले म्हणून. सध्याची परिस्थीती तशी निर्माण झालेली आहे. यावर आता थोडासा विचार मंथन व्हावे असे नक्कीच वाटत आहे आणि असे झालेही पाहिजे.
सध्या समाजात एक मानसिकता बनू पाहत आहे. जे काही मिळेल ते ऐत पाहिजे. फुकट पाहिजे. शासनाच्या अनेक खर्या अर्थाने गरजूंसाठी उपयुक्त, परंतु, समाजाला एका विशिष्ट आशा लोभस योजनेने समाजाची मानसिकता आळशी बनू पाहत आहे. सर्वकाही ऐत मिळत आहे. काम करणे म्हणजे नकोसे.
कारण तशी अनेक आहेत. शासनाच्या योजना म्हणजे कौतुकास्पदच. कारण आता या सर्व योजना अगदी तालागापर्यंत शासन पोहोचवले आहे. गोर-गरीब- निराधार,विधवा, तसेच दिव्यांग, अस्थिव्यंग यांच्यासाठी तर शासनाने सध्या अनेक योजना राबवीत आहे. याशिवाय आता मुख्यमंत्री माझी लाडली बहीण, लाडला भाऊसाठीची योजना यामुळे सर्वाना काही ना काही लाभ भेटत आहे. याशिवाय रेशनसुद्धा मुक्त मिळत आहे.
काही राज्यात महिलांना मोफत एसटी प्रवास योजना अशा समाजोपयोगी योजनेने शासन सर्वांगीण विकासाचे प्रयत्न करीत आहे खरे. या सर्व योजनाचा दुरुपयोग होता कामा नये, समाजाची मानसिकता अलास्यात्वाकडे जाता कामा नये, बस्स या निमित्ताने एवढेच.