सोहनलाल पल्लोड, ओमप्रकाश दायमा यांना दाधीच समाजभूषण पुरस्कार जाहीर

 

श्री दाधीच समाज संस्थेतर्फे बुधवारी पुरस्कार वितरण समारंभ

त्यागमूर्ती महर्षी दधीची जयंतीचे औचित्य

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : श्री दाधीच (दायमा) समाज संस्थेतर्फे देण्यात येणारे राज्यस्तरीय दाधीच भूषण पुरस्कार यंदाच्यावर्षी सोहनलाल पल्लोड आणि ओमप्रकाश दायमा यांना जाहीर झाले आहेत. त्यागमुर्ती महर्षी दधीची जयंतीनिमित्त बुधवार, दि. ११ सप्टेंबर रोजी चाटी गल्ली येथील गायत्री भवनात सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.

उत्कृष्ट सामाजिक कार्य आणि योगदानासाठी श्री दाधीच (दायमा) समाज संस्थेतर्फे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. त्यागमूर्ती महर्षी दधीची जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत चाटीगल्ली येथील गायत्री भवनमध्ये दधीच युवा संघटनेतर्फे रक्तदान शिबीर होणार आहे. सायंकाळी पाच वाजता त्याच ठिकाणी पूजा, पुरस्कार वितरण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर रात्री आठ वाजता समाज बांधवांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. यावेळी समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री दाधीच (दायमा) समाज संस्थेचे अध्यक्ष भरत काकडा आणि सचिव विजयकुमार इटोदिया (दायमा) यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *