सचिवपदी रमेश पवार यांची निवड
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर क्राईम रिपोर्टर संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक जनसत्यचे अरुण रोटे यांची तर सचिवपदी दैनिक दिव्य मराठीचे रमेश पवार यांची निवड करण्यात आली.
क्राईम रिपोर्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दैनिक सुराज्यचे अखलाक शेख व दैनिक लोकमतचे विलास जळकोटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. त्यामध्ये एक वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकारी असे :
- अध्यक्ष : अरुण रोटे (दैनिक जनसत्य)
- उपाध्यक्ष : तात्या लांडगे (दैनिक सकाळ)
- संताजी शिंदे : (दैनिक लोकमत)
- सरचिटणीस : रमेश पवार (दैनिक दिव्य मराठी)
- खजिनदार : परशुराम कोकणे (स्मार्ट सोलापूरकर)
- सहचिटणीस : रजनीकांत उपलंची (जनदर्पण चॅनेल).
- कार्यकारिणी सदस्य : इरफान शेख, रुपेश हेळवे, मुज्जमील शहानुरकर, मुन्ना शेख, मुकुंद उकरंडे, रोहन नंदाणे, रत्नदीप सोनवणे, भरत मोरे.
- सल्लागार : अखलाक शेख, अनिल कदम, संजय जाधव, सरदार आत्तार, विलास जळकोटकर, अमोल व्यवहारे, धनंजय मोरे, विनायक होटकर, विजयकुमार राजापुरे.