IPL PLAYER ARSHIN KULKARNI यांच्या हस्ते ‘श्री समर्थ गणपती’ची महापूजा

SOLAPUR : LUCKNOW SUPERGIANTS TEAM’S IPL PLAYER & Solapur’s cricketer Arshin Kulkarni performs Mahapuja of ‘Shri Samarth Ganapati’

सोलापूरचा क्रिकेटर अर्शीन कुलकर्णी यांनी केली श्रींची महापूजा

 

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  सोलापूरचा क्रिकेटर अर्शीन कुलकर्णी यांच्या हस्ते ‘श्री समर्थ गणपती’ची महापूजा करण्यात आली.

संग्राम गणेशोत्सव व बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या ‘श्री समर्थ गणपती’ची महापूजा सोलापूरचे सुपुत्र आणि (LUCKNOW SUPERGIANTS TEAM’S IPL PLAYER)  लखनऊ सुपरजायंट्स संघातील युवा क्रिकेटपटू  (CRICKETER ARSHIN KULKARNI) अर्शीन कुलकर्णी यांच्या हस्ते उत्साहात पार पडली.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष  आकाश खंडागळे यांच्या हस्ते  अर्शीन कुलकर्णी यांचा श्रीफळ आणि गणपतीची छायाचित्र प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या यशस्वी क्रिकेट कारकिर्दीबद्दल शुभेच्छा देत मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांनीही त्यांचा विशेष सत्कार केला. याप्रसंगी (SOLAPUR DISTRICT CRICKET ASOCIATION JOINT SECRETARY) सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सू यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *