सोलापूर संघ सुपर लीगसाठी पात्र

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वरिष्ठ महिला आमंत्रित सामाना; भक्ती पवारची अष्टपैलू कामगिरी

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रित वरिष्ठ महिलांच्या (वनडे) एकदिवसीय स्पर्धेमध्ये  सोलापूरच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत या स्पर्धेत अनुक्रमे पाचपैकी चार सामने जिंकून सुपर लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सोलापूर संघाने अनुक्रमे बीड जिल्हा संघ, ज्युडिशियल क्लब पुणे, हिंगोली संघ, धुळे जिल्हा संघ या सर्व बलाढ्य संघावर मात केली आहे.

यामध्ये कर्णधार साक्षी वाघमोडे, भक्ती पवार, माही राठोड, कार्तिकी देशमुख, प्रतिभा माशाळे, स्नेहा शिंदे यांची उत्कृष्ट फलंदाजी, विभावरी देवकते, भक्ती पवार, अमृता गव्हाणे, पूनम माशाळे यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेत भक्ती पवारने अष्टपैलू कामगिरी केली आहे. तिने गोलंदाजीमध्ये 5 मॅचेसमध्ये 14 बळी घेतले. कर्णधार साक्षी वाघमोडेने शतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या उत्कृष्ट कामगिरीसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, सेक्रेटरी धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेम्बर्सू, महिला निवड समितीच्या चेअरमन किरण मणियार, स्नेहल जाधव, सारिका कुरनूरकर, मानसी जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *