U-14 निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा

U-14 CRICKET SELECTION TRIAL ON 11,12 SEPT. IN SOLAPUR

 सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : SOLAPUR U-14 CRICKET SELECTION:  सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्यावतीने गुरुवार, दि. 11 सप्टेंबर  व  शुक्रवार, दि.  12 सप्टेंबर 2025 रोजी 14 वर्षांखालील मुलांची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा होणार आहे. असे सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे (SOLAPUR DISTRICT CRICKET ASOCIATION) संयुक्त सचिव (JOINT SECTETARY) चंद्रकांत रेम्बर्सू यांनी कळविले आहे.

  • सदरची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा विजयपूर रोड, जुळे सोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सकाळी 9 ते 1 व दुपारी 2 ते 5.30 यावेळेत होणार आहे.

  • सदरची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा  निवड चाचणी क्रिकेट समितीचे चेअरमन  राजेंद्र गोटे, सत्यजित जाधव, विक्रांत पवार, डॉ. महेश ढेंबरे, राजू रंगाम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, ते सोलापूर जिल्हा १४ वर्षांखालील मुलांचा संघ निवडणार आहेत.

(Selection Test Cricket Tournament) निवड चाचणीपूर्वी सर्व खेळाडूंनी आपलं खेळाडू रजिस्टर  करून घेणे महत्त्वाचे (बंधनकारक) आहे.  ज्यांना निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावयाचे आहे अशांनी  500 रुपयांची  निवड चाचणी फी  (QR CODE) क्यू आर कोडद्वारे सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या अकाउंटमध्ये (A/C) जमा करावी. अकाउंटमध्ये पाचशे रुपये टाकल्यानंतर त्याखाली एक ऑप्शन येते, त्या ऑप्शनमध्ये खेळाडूचे नाव व जन्मतारीख टाकून त्याची प्रिंट काढून सिलेक्शनच्या दिवशी ती दाखवावी.

रजिस्टर झालेल्या खेळाडूंनी सोबत रजिस्टर कार्ड आणणे बंधनकारक आहे.  पाचशे रुपये भरल्याची पावती दाखवून सिलेक्शनला उतरावे.  या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत (Cut off date)  कट ऑफ डेट अर्थात दि. १ सप्टेंबर २०११ च्या पुढे जन्म झालेल्या खेळाडूंना निवड चाचणीसाठी उतरता येईल. निवड चाचणी स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंनी पांढऱ्या गणवेशात उपस्थित रहावे. पालकांनी चाचणीदरम्यान कोणत्याही प्रकारचे व्यत्यय आणू नये, सिलेक्टरना बाधा येईल असे  कृत्य करु नये. पाऊस पडल्यास तारखेत बदल होईल. असे सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे (SOLAPUR DISTRICT CRICKET ASOCIATION) संयुक्त सचिव (JOINT SECTETARY) चंद्रकांत रेम्बर्सू यांनी कळविले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *