२३ वर्षाखालील मुलांचे राज्य संघ निवड चाचणी क्रिकेट सामने; एमसीए बी संघाच्या ४०५ धावा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : हर्ष मोगवीराची धमाकेदार १७९ धावांची खेळी आणि निमिर जोशीचे ७ बळी यांच्या दमदार खेळीमुळे २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात रोचकता निर्माण झाली आहे. सोलापुरातील पार्क स्टेडियम आणि दयानंद कॉलेजच्या मैदानावर हे क्रिकेट सामने सुरु आहेत.

इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवरील सामन्यात एमसीए बी संघाने ७४.२ षटकात दहा बाद ४०५ दहाव्या केल्या. यामध्ये हर्ष मोगावीरा १७९ धावा, हर्ष ओसवाल ७९ धावा, हर्षल हाडके ५५ तर सागर पवारच्या ३४ धावांचा समावेश आहे.
गोलंदाजीत एमसीए डी संघाकडून निमिर जोशी याने ६१ धावांत ७ बळी घेतले. शुभम खरात, यश खळदकर यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला. दयानंद कॉलेज मैदानावर एमसीए ए आणि सी यांच्यात सामना सुरु आहे. एमसीए ए संघाने १५ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात ५२ धावा कुटल्या. यामध्ये नीरज जोशी नाबाद २८, कौशल तांबेच्या १० धावांचा समावेश आहे. गोलंदाजीत एमसीए सीकडून वैभव टेहळे, निलय संघवी यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला. महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्यावतीने हे सामने सुरु आहेत.

