सोलापुरात रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

‘मिडिया कप’चे शनिवारी होणार उदघाटन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व सोलापूर ॲडव्हार्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन (सावा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिडिया कप २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सोलापुरातील रेल्वे मैदानावर  होणार आहे. याचे उद्घाटन  सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक योगेश पाटील, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सावा संघटनेचे अध्यक्ष संतोष उदगिरी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून माजी नगरसेवक अनंत जाधव हे लाभले आहेत.  सहप्रायोजक म्हणून माजी नगरसेवक अमोल शिंदे, स्पेनका तर विशेष सहकार्य व्ही.आर. पवार सारीज्, बँक ऑफ इंडिया, सीए विनोद भोसले यांचे सहकार्य असणार आहे. या मिडिया कप २०२५ च्या स्पर्धेत १० संघ सहभागी होत आहेत. अंदाजे २०० हून अधिक पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांचा समावेश असणार आहे.

पहिल्या दिवशी १० सामने तर दुसऱ्या दिवशी १० सामने होणार आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. त्यानंतर त्याचठिकाणी बक्षीस वितरणाचा समारंभ होणार आहे. या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी सोलापुरातील क्रिकेट प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रमिक पत्रकार संघ व सावा संघटनेने केले आहे.

सामन्यांचे थेट प्रक्षेपण मोबाईलवर…

रेल्वे मैदानावर होत असलेल्या मिडिया कप २०२५ मधील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे सामने मोबाईलवर पाहता येणार आहेत. यासाठीची विशेष व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे. शिवाय लाईव्ह स्कोरही मोबाईलवर पाहता येणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *