डी.बी.देवधर चषक-२०२५ : पहिल्या डावात सदू शिंदे संघ आघाडीच्या तर सदानंद मोहोळ संघ २०० च्या उंबरठ्यावर

 मेहुल पटेल, मुर्तझा ट्रंकवाला यांची  दमदार अर्धशके तर तनय संघवीचे पाच  बळी

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सौजन्याने येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियम तसेच दयानंद कॉलेज मैदानावर महाराष्ट्रातील वरिष्ठ गटाच्या मुलांच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्रिकेट महर्षी डी.बी.देवधर चषकाच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे.

इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सदू शिंदे संघ हेमंत कानिटकर संघावर पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी आघाडी घेईल तर दयानंद कॉलेजच्या मैदानावर सदानंद मोहोळ संघ २०० धावांचा टप्पा गाठेल असे चित्र आहे. हेमंत कानिटकर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली खरी पण त्यांचा संपूर्ण संघ १३८ धावांवर गारद झाला. पहिल्या दिवस अखेरीला खेळ थांबला तेव्हा सदू शिंदे संघाने प्रत्युत्तरादाखल २ बाद १३४ धावा केल्या आहेत.  दुसऱ्या सामन्यात वसंत रांजणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी पत्करली आणि सदानंद मोहोळ संघाचे पहिले पाच खेळाडू ७८ धावात बाद केले. पण पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा ९ बाद १ धावा झाल्या.

 

  • संक्षिप्त धावफलक: (इंदिरा गांधी पार्क स्टेडियम)

  • हेमंत कानिटकर ईलेव्हन :

  • ३७ षटकात १० बाद १३८ धावा.  संग्राम भालेराव ३० धावा, सिद्धार्थ म्हात्रे २६ धावा.  ए.नलावडे २२ धावा. गोलंदाजी: रवींद्र जाधव ३४ धावात तीन बळी. मनोज इंगळे, वैभव विभुते प्रत्येकी दोन दोन बळी, आतिश राठोड, प्रशांत सोळंकी व अक्षय वाईकर प्रत्येकी एकेक बळी.

  • सदू शिंदे ईलेव्हन : २८.४ षटकात २ बाद १३४ धावा.  मुर्तझा ट्रंकवाला नाबाद ५८ धावा , श्रीपाद निंबाळकर २६ धावा, रोहित हडके २५ धावा, अवांतर २५ धावा. गोलंदाजी: राजवर्धन हंगरगेकर व सोहन जमाले प्रत्येकी एकेक बळी.

  • दयानंद कॉलेज ग्राउंड:

  • सदानंद मोहोळ ईलेव्हन: ५७ षटकात ९ बाद १९३ धावा. मेहुल पटेल ७८ धावा, सत्यजीत बच्छाव २७, हर्षल हाडके १९ धावा. गोलंदाजी :  तनय संघवी ३६ धावात पाच बळी, अथर्व चौधरी, स्वराज चव्हाण, समशुझमा काझी, यश खळदकर प्रत्येकी एकेक बळी.

दोन्ही सामन्यादरम्यान वरिष्ठ गटाचे संघ निवडकर्ते उपस्थित असून, प्रत्येक खेळाडूंचा खेळ निरखून पाहत आहेत.  पंच म्हणून नंदकुमार टेळे, नवीन माने, चिराग शहा, पृथ्वीराज गांधी हे काम पाहत  आहेत.  गुणलेखक म्हणून मिलिंद गोरे व प्रसाद शावंतुल हे काम पाहत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *