भाग-२ : राजीनाम्याची चर्चा व्हायरल! : भूषण जाधव : मेडिकल आणि वैयक्तिक कारणास्तव राजीनामा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर: सोलापुरातील महापालिकेचे क्रीडा अधिकारी भूषण जाधव यांनीदेखील राजीनामा दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यासंदर्भात भूषण जाधव यांनी गेल्या १५ जुलै २०२५ रोजीच आपण अधिकृत राजीनामा दिल्याचे “अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क”शी बोलताना सांगितले. मेडिकल प्रोब्लेम आणि वैयक्तिक, घरगुती अडचणीमुळे आपण सोलापूर महानगर पालिका क्रीडा अधिकारी या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा अर्ज संबंधित महापालिका प्रशासन, आयुक्तांकडे लेखी स्वरुपात सुपूर्द केल्याचेही सांगितले. त्यांचा राजीनामाही मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातमीला सोलापुरातील विविध क्रीडा शिक्षक संघटनेचे पदाधिकरी, विविध क्रीडा संघटक, ज्येठ क्रीडा मार्गदर्शकांनीही दुजोरा दिला आहे. या संपूर्ण घडामोडीदरम्यान त्याच्या राजीनाम्याची चर्चा व्हायरल झाली आहे. सोलापूरची जनता ही खूप प्रेमळ आणि सहकार्य वृत्तीची असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

आगामी सोलापुरातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या क्रीदाधीकार्याने राजीनामा दिल्याने शालेय क्रीडा स्पर्धांवर याचा गंभीर आणि विपरीत परिणाम होईल, असे क्रीडा शिक्षकामधून चर्चा होत आहे. शालेय क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून विविध खेळात करिअर घडवू पाहणाऱ्या खेळाडूंच्या भवितव्याचे काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
