अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर; सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर होत्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, डॉ. स्मिता चाकोते, हास्य सम्राट दीपक देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात सदाशिव पडदुणे म्हणाले, दि.८ मार्च १८५७ रोजी अमेरिकेतील महिलांनी उठाव करून कामावर सुट्टी मिळावी, यासाठी मागणी केली. दि. ८ मार्च १९१७ रोजी रशिया येथे महिलांनी विविध हक्कासाठी आंदोलन केले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात महिला एकत्र आल्या होत्या. म्हणून दि. ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
अमृत नाटेकर म्हणाले, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. महात्मा गांधी यांच्या इंग्रजाविरुद्धच्या चलेजाव आंदोलनात महिलांचा सहभाग सर्वात जास्त होता. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. महिला दिनाची थीम म्हणून स्वाक्षरी बोर्डावर सर्व महिलांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमृत नाटेकर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे पत्र वाचून दाखवले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महिलांना शुभ संदेश पाठवून दिला. महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. स्मिता चाकोते यांनी महिलांच्या आरोग्य विषय काही टिप्स दिल्या व जास्तीत जास्त निरोगी व आनंदी आयुष्य कसे जगता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. मनिषा कुंभार, अमृत नाटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. मोनिका सिंग ठाकूर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देणारे गीत सादर केले. स्यसम्राट दीपक देशपांडे, आबा पाटील यांनी आपल्या अनोख्या विनोदाचे सादरीकरण केले.