सोलापूरचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक लढा

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते

भारताच्या ७८ स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण

by assal solapuri||

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ब्रिटिशांच्या १५० वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉ ची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते. त्यामुळे सोलापूरचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.  भारताचा ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर महापालिका आयुक्त शीतल उगले-तेली, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वैशपांयन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अन्य अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या ७८ व्या  स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. या समारंभास उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य, सैनिक ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार त्यांची सदिच्छा भेट घेऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्राचा अभिमान असलेला राष्ट्रध्वज तिरंगा ची सर्व मान्यवरांनी शपथ घेतली.

========================================================================================

   जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे, त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. “हर घर तिरंगा” मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे. ही मोहीम संपूर्ण देशासह सोलापूर जिल्ह्यात ही अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे.

   विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, संस्कृती, पर्यटन या क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन ही सर्व प्रकारचे सहकार्य करत आहे. प्रशासन ही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचतील, यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

====================================================================================

मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण-

  • जिल्हाधिकारी कार्यालय-

उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक-३ सोलापूर  संतोषकुमार व्यंकटराव देशमुख यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना शाखा जयश्री पंच उत्कृष्ट नायब तहसीलदार, आस्थापना शाखा लक्ष्मीकांत आयगोळे उत्कृष्ट अव्वल कारकून, महसूल शाखा अविनाश स्वामी उत्कृष्ट महसूल सहाय्यक, महसूल शाखा गणेश जगताप उत्कृष्ट शिपाई यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

  • पोलीस आयुक्त कार्यालय-

नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल विशेष सेवा पदक सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब बाळू सावंत व पोलीस उपनिरीक्षक नागेश आप्पासाहेब येणपे यांना तर पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील हांडे यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम. राजकुमार व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.

  • जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाचे मुख्य लिपिक श्याम सुरवसे यांना लेखाविषयक महत्त्वपूर्ण कामकाज केल्याबद्दल उत्कृष्ट मुख्य  लिपीक म्हणून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *