मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा

                                                                                                  image source

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार, दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मुंबईहून सोलापूरकडे विमानाने प्रयाण करणार आहेत. सकाळी १२.१५ वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सोलापुरातील होम मैदान येथे मोटारीने ते प्रयाण करतील. दुपारी १२.३० वाजता महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी २.३० वाजता ते परत मोटारीने सोलापूर विमानतळ येथे प्रयाण करतील. दुपारी २.४५ वाजता सोलापूर विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल त्यानंतर ते विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी सोलापुरात येणारे मुख्यमंत्री सोलापुरातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार असून, याची उत्सुकता लागली आहे.

सोलापूर शहर-जिल्हा शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्र्याचे जंगी स्वागत होणार

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी सोलापुरात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी शहरभरात स्वागताचे फलक आणि भगवे पताके लावण्यात आले आहेत. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हाप्रमुख अमोल (बापू) शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वागताची जय्यत तयारी केली असून, शहरात शिवसेनेचे वातावरण केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर असताना शासकीय कार्यक्रम पार पडल्यानंतर सातरस्ता येथील मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देणार आहेत. तरी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *