पोपटांची कंपनी : नवल आणि कुतुहूलच!

मानवी वस्त्यांमध्येही आता सर्रासपणे वावर.. अर्थात पोपटही आता माणसाळले..

by assal solapuri ||

सोलापूर :  कारण एरव्ही मानवी वस्त्यांमध्ये, गडबड-गोंधळ,कालवा आणि वर्दळीच्या ठिकाणी पक्षी, प्राणी मात्रांचा वावर थोडेसे कमीच असते. मात्र गुरुवारी (दि. २२ सप्टेंबर २०२४) दुपारच्या सुमारास सोलापुरातील मध्यवर्ती असा वर्दळीचा ठिकाण म्हणजे टिळक चौक, चाटी गल्ली-फलटण गल्ली (कापड बाजार).

या भागातील जमुना टी सेंटर आणि नवनीत क्लॉथ सेन्टरच्या समोर अगदी रस्त्याच्यावर दोन्ही बाजूच्या भिंतीना मक्याची कणसे दोरीने बांधली होती. त्या कणसांवर अगदी मस्तपैकी ताव मारणारी पोपटांची कंपनी. या कंपनीचा कणीस खाता खाता त्यांची किलबिलही सुरु होती. त्यामुळे हे दृश सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.  वीस-पंचवीस मक्याची कणसे दोरीच्या साह्याने बांधली होती. जेणे करून पोपटाना आरामशीरपणे खाता यावे. जवळपास वीस-पंचवीस पोपटांची कंपनी. अगदी मजेत मक्याची कणसं खात होती. येणाऱ्या-जाणाऱ्यांना हा थोडासा विहंगमय दृश्य होता. अनेकजण थांबून हे दृश पाहत होते.

अनेकजण फोटोदेखील आपल्या मोबाईलमधून काढत होते. खरोखरच येथील व्यापारी वर्गांचे कौतुक करावे तितके कमीच. कारण व्यवसाय, व्यापार सांभाळत मुक्या प्राण्यांची,पशु-पक्षी यांची सेवादेखील करून मानवतावादी धर्म निभावताना दिसून आले.

=====================================================================================

पोपटांविषयी थोडेसे….

पोपट संघचारी (गटाने एकत्र राहणारे) असून सगळ्या पक्ष्यांमध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी आहेत. त्यांचा आवाज कर्कश, किंचाळल्यासारखा आणि कर्णकटू असतो; परंतु पाळून शिकविल्यानंतर यांच्या कित्येक जाती माणसासारखे शब्दोच्चार करु शकतात. इतकेच नव्हे तर ते माणसांप्रमाणे  दोनचार वाक्ये बोलू शकतात. यामुळे पुष्कळ लोक पोपट पाळतात. मात्र आता पोपट पाळणे यावर बंदी आहे.

पोपट विविध स्वरांचा वापर करून संवाद साधतात. ज्यामध्ये स्क्वॉक्स, किलबिलाट आणि अगदी मानवी भाषणाची नक्कल करणेदेखील समाविष्ट आहे.  यासाठी ते प्रसिद्ध आहेत. नक्कल करण्याची ही क्षमता केवळ कॉपीकॅट व्यायाम नसून, सामाजिक परस्परसंवादाचा एक प्रकार आहे. ज्याचा उपयोग अनेकदा त्यांच्या मानवी काळजीवाहू किंवा जंगलातील कळपातील सोबत्यांशी सामाजिक बंधने मजबूत करण्यासाठी केला जातो. आफ्रिकन ग्रे आणि ऍमेझॉन पोपट सारख्या काही प्रजाती, विशेषत: उल्लेखनीय स्पष्टतेसह मानवी भाषणाची नक्कल करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत.

पोपटदेखील भावना किंवा हेतू व्यक्त करण्यासाठी देहबोली वापरतात. उदाहरणार्थ, पिसे फुगवणारा पोपट घाबरलेला किंवा धोक्यात आल्यावर अधिक ठळक दिसण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याचप्रमाणे, पंख फडफडण्याचे प्रदर्शन उत्साह किंवा लक्ष देण्याची आवश्यकता दर्शवू शकते. हे संकेत समजून घेणे हे या बुद्धिमान पक्ष्यांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंध जोडण्यासाठी महत्त्वाचे आहे, मग ते घरातील वातावरण असो किंवा वन्यजीव संदर्भात.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *