द्वितीय निर्मला बुरा, तृतीय सरस्वती मुटकिरी; कोक्कूल, कैरमकोंडा, उय्याला यांना उत्तेजनार्थ बक्षीस
अस्सल सोलापुरी नेटवर्क:
सोलापूर : “बोम्मारिल्लू बनवा, बक्षीसे मिळवा!” या तेलुगू भाषिकांसाठी आयोजित उपक्रमात सौंदर्या कोटा या प्रथम क्रमांकासह विजेतेपदाच्या मानकरी ठरल्या. निर्मला बुरा द्वितीय, सरस्वती मुटकिरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच अमला श्रीकांत कोक्कूल, खुशी श्रीनिवास कैरमकोंडा, कल्याणी विनायक उय्याला यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेसाठी अन्य भाषिक समाजाच्या सपना गणेश शालगर आणि वैष्णवी आनंद शिंदे यांनी सहभाग नोंदवल्याबद्दलअंबादास नारायण पेनगोंडा यांनी त्यांच्यातर्फे आकर्षक बक्षीस देण्याची घोषणा केली. प्रथम क्रमांकासाठी श्रीधर सुरा यांच्याकडून आकर्षक ‘लेडीज वॉच’, द्वितीय क्रमांकासाठी शामला मुरलीधर अल्ले यांच्यातर्फे ‘प्रवासी बॅग’, तृतीय क्रमांकासाठी राधिका दत्तू पोसा यांच्यातर्फे ‘इस्त्री’ तर सखी फॅशन कॉर्नरतर्फे मनोज पिस्के यांच्यातर्फे आकर्षक बक्षीस देण्यात आले.

श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन व पद्मशाली सखी संघमच्यावतीने तेलुगू भाषिकांसाठी यंदाच्या दिवाळीत ‘आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपणच जपूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन ”बोम्मारिल्लू बनवा, बक्षीसे मिळवा”.! हा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर आणि जालना येथील जवळपास ६० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रवेश नि:शुल्क होता. यावेळी माजी नगरसेविका राधिका दत्तू पोसा, रोजा मनोज पिस्के, परिक्षक स्मिता हरिप्रसाद बंडी, पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी अंबादास पेनगोंडा उपस्थित होते.
तेलुगू भाषिक महिलांनी बोम्मारिल्लूद्वारे तेलुगू संस्कृतीचा वारसा व परंपरा जपली आहे. याचा अभिमान वाटतो. असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी स्मिता श्रीधर नडीमेटला यांनी केले. बोम्मारिल्लू हा स्तुत्य उपक्रम असून, यामुळे महिलांच्या कर्तृत्वाला वाव मिळतो. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याने त्या अधिक सक्षम होतात,असेही नडीमेटला म्हणाल्या.

पूर्व भागातील यल्लालिंग मठाजवळील सुवी सभागृहात या स्पर्धेचे पारितोषक वितरण झाले. परीक्षक म्हणून स्मिता बंडी यांनी बोम्मारिल्लू साकारलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली. वारसा, नाविन्यता, सामाजिक संदेश, वेगळेपणा या निकषांवर गुण देऊन पुरस्कारासाठी निवड केली. स्पर्धकांनी आकर्षक रांगोळी काढून, विविध कलाकुसरीतून ‘बोम्मारिल्लू’ साकारले होते. विजेत्यांची नावे स्मिता बंडी यांनी जाहीर केले.

- ‘बोम्मारिल्लू’ विजेत्या स्पर्धकांनी नावे पुढीलप्रमाणे..
- प्रथम क्रमांक: सौंदर्या गोविंद कोटा, द्वितीय : निर्मला वासुदेव बुरा, तृतीय : सरस्वती माणिक मुटकिरी.
- ‘उत्तेजनार्थ’ : अमला श्रीकांत कोक्कूल, खुशी श्रीनिवास कैरमकोंडा, कल्याणी विनायक उय्याला.
- या स्पर्धेसाठी इतर भाषिक समाजाच्या सपना गणेश शालगर आणि वैष्णवी आनंद शिंदे यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल अंबादास नारायण पेनगोंडा यांच्यातर्फे प्रोत्साहनपर आकर्षक बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले.
प्रथम क्रमांकासाठी श्रीधर सुरा यांच्याकडून आकर्षक ‘लेडीज वॉच’, द्वितीय क्रमांकासाठी शामला मुरलीधर अल्ले यांच्यातर्फे ‘प्रवासी बॅग’, तृतीय क्रमांकासाठी राधिका दत्तू पोसा यांच्यातर्फे ‘इस्त्री’ तर सखी फॅशन कॉर्नरतर्फे मनोज पिस्के यांच्यातर्फे आकर्षक बक्षीस देण्यात आले.
श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन व पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन हेमा मैलारी, स्वागत गीता भूदत्त, प्रास्ताविक सविता येदूर यांनी केले. आभार प्रदर्शन वनिता सुरम यांनी केले. यावेळी पल्लवी संगा, मनोज पिस्के, वैकुंठम् जडल, ओमसी पल्ली यांच्यासह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
