कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे; कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी १९३४ साली बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. खेड्यापाड्यातील मुले शिक्षणापासूण वंचित  राहू नये, त्यांना चांगले शिक्षण घेता  यावं यासाठी वस्तीगृह काढले. मामांचे शैक्षणिक कार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाले असून, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, उपद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, उपाध्यक्ष  एन. एन. जगदाळे, जनरल सेक्रेट्ररी  पी.टी.पाटील, जाँईट सेक्रेटरी  ए.पी.टेबडवार, खजिनदार  शितोळे, विदयार्थी, आदी मान्यवर  मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, वसतीगृह चालविण्यासाठी  मामांनी  लोकांकडून धान्य गोळा करणे, निधीची उपलब्धता करणे, यासाठी अथक प्रयत्न केले. वस्तीगृह चांगल्या प्रकारे सुरू झाले. लोकांनी दिलेले दान सतपात्री लागावं आणि ते जगदाळे मामांच्या रूपाने सतपात्री लागत होतं. त्यामुळे लोकांनी ही भरभरून दान दिले. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी  या संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर. या दोन्ही व्यक्तींचे कर्तव्य मोठे आहे. शास्त्रज्ञाला स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः कष्ट करून मोठे व्हावे लागते, असेही  त्यांनी यावेळी सांगितले.

सर्व सामान्य लोकापर्यंत शिक्षण पोहचविण्याचे काम तसेच ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचे आयुष्य घडविण्याचे प्रचंड मोठे काम डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी केले आहे, असे प्रतिपादन डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.   याप्रसंगी  डॉ.अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राज्यपाल  हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र,  एक लाख रुपयांचा धनादेश देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *