
सोलापूर बार असोसिएशनचा उपक्रम
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||
सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनच्यावतीने सन २०२५-२६ सालच्या ॲडव्होकेट टेलिफोन डिरेक्टरीचे प्रकाशन जिल्हा न्यायाधीश कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विजय शिंदे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे विद्यमान सदस्य ॲड. मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश कटारिया, ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. प्रदीपसिंह राजपूत, ॲड. बापूसाहेब देशमुख, ॲड. लक्ष्मण मारडकर, ॲड. खतीब वकील यांनी डिरेक्टरी प्रकाशनाचे आणि वर्षभर पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
- सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला. या डिरेक्टरीमध्ये जिल्ह्यातील वकील, जिल्हा, तालुका न्यायालय, शासकीय व निमशासकीय कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि सर्वच पोलीस स्टेशनचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. डिरेक्टरीमध्ये बार असोसिएशन सन २०२४-२५ सालच्या पदाधिकाऱ्यांनी वर्षभरात केलेल्या सर्व उपक्रमांचे छायाचित्र छापण्यात आले आहे. कायद्यातील विविध तरतुदींचा देखील या डिरेक्टरीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमास सोलापूर बार असो.चे अध्यक्ष ॲड. व्ही. पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज नागेश पामूल, सहसचिवा ॲड. निदा अनिस सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार सि. कटारे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव ॲड मनोज पामुल, आभार प्रदर्शन ॲड. ॲड. निदा अनिस सैफन यांनी केले.