सोलापूर “ब” संघाने पटकावला “सोलापूर बार चषक-२०२४”

 बार्शी वकील संघ ठरला उपविजेता; २० संघांचा सहभाग

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशन वार्षिक स्नेहसंमेलन-२०२४  निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वकिलांच्या सोलापूर बार प्रीमियर लीगमधील अंतिम सामन्यात सोलापूर “ब” संघाने सोलापूर बार चषक पटकावला. या स्पर्धेत न्यायाधीशांच्या एका संघासह एकूण २० वकिलांच्या संघांचा समावेश होता.

सोलापूर शहर मुख्यालय आणि ग्रामीण मुख्यालय या दोन्ही मैदानावर साखळी सामने तीन दिवस चालले आणि उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने मुख्यालय शहर मैदानावर दि. २९ डिसेंबर रोजी पार पाडले.

अंतिम सामना सोलापूर “ब” संघ आणि बार्शी वकील संघ यांच्यात झाला. अंतिम सामन्यात सोलापूर व संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व या संघाने १०५ धावा केल्या. शिवकुमार वाले यांनी सर्वाधिक २१ चेंडूमध्ये ४९ धावा काढल्या. स्वप्निल पुंजाल व शिव वाले यांनी ४३ धावांची उत्तम भागीदारी केली. प्रत्युत्तरात बार्शी वकील संघाने अडखळत सुरुवात केली आणि एकानंतर एक विकेट गमावल्या.

कै. ॲड. व्ही. डी. फताटे यांच्या स्मरणार्थ ॲड. विक्रांत फताटे यांच्या सौजन्याने विजेता पुरस्कार सोलापूर “ब”  संघास आणि उपविजेता पुरस्कार बार्शी वकील संघास प्रमुख पाहुणे सोलापूरचे सुपूत्र महाराष्ट्र राज्याचे माजी महाअधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी यांच्या  हस्ते देण्यात आला.

अंतिम सामन्यात सामनावीर आणि स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर म्हणून ॲड. शिवकुमार वाले यांना सन्मानित केले. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार बार्शी वकील संघाचे ॲड. योगेश सावळे यांनी पटकावला.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोलापूरचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी महाअधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर होते. यावेळी सोलापूरचे सुपुत्र ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश गणेश पवार, सोलापूरचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर नागरगोजे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  कंकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बक्षीस वितरण समारंभाच्या प्रारंभी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांनी प्रास्ताविक केले. सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची परंपरा जुनी आहे. दरवर्षी अशाच प्रकारे विविध कला गुणदर्शन आणि खेळांचे स्पर्धा भरविले जाणे वकिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे ॲड. अमित आळंगे  यांनी सांगितले. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुके आणि सोलापूर शहरातून एकूण वीस वकिलांच्या क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला.

 प्रमुख पाहुणे ॲड. आशुतोष कुंभकोणी म्हणाले, क्रिकेट स्पर्धेच्या उपक्रमाचे आणि एकंदरीत वकिलांच्या हिताच्या कार्यक्रमाचे कौतुक करीत वकिलांना त्यांच्या कामामुळे उद्भवणाऱ्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी खेळ हे एकमेव माध्यम असल्याचे सांगितले.  सोलापूर बार असोसिएशनमध्ये वकिली करीत असताना झालेल्या वकील आणि न्यायाधीश मंडळीच्या क्रिकेट सामन्याचेदेखील आठवणी त्यांनी सांगितल्या.  न्यायालयातील  विविध किस्से आणि आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, वकिलांसारख्या असोसिएशनमध्येदेखील त्यांच्या व्यस्त जीवनात अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याने सोलापूर बार असोसिएशनचे कौतुक केले. विजेत्या व उपविजेत्या संघाला शुभेच्छा दिल्या. याशिवाय वकील, न्यायाधीश आणि पोलिस यांच्यामध्येदेखील  क्रिकेटचे सामने व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.

सदर कार्यक्रमात विजेत्या संघाचे कर्णधार ॲड. विक्रांत फताटे आणि उपविजेत्या संघाचे कर्णधार ॲड. विशाल गोणेकर यांनी मनोगत व्यक्त करून सोलापूर बार असोसिएशनचे आभार मानले. या बक्षीस वितरणाच्या समारंभात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. एस. आळंगे, ॲड. रोहिदास पवार आणि ॲड. झुलेका पिरजादे यांनी मनोगत व्यक्त केले.

सदर संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ॲड. शिरीष जगताप, ॲड. निशिकांत देगावकर, ॲड. शुभम माने, ॲड. प्रकाश सोनार, ॲड. योगेश कुर्रे, ॲड. इरेश स्वामी, ॲड. स्वप्निल पुंजाल, ॲड. तुषार पामुल,ॲड. बालराज कैरमकोंडा, ॲड. बशीर शेख, ॲड. अमर जिंदम, ॲड. संतोष पुजारी, ॲड. सिद्धाराम पाटील, ॲड. बसवराज बळुर्गे, ॲड. प्रवीण ननवरे, ॲड. अविनाश खरटमल, ॲड. नाना द्वारकेश, ॲड.  सौरभ जगताप, ॲड. दिलीप जगताप, ॲड. राहुल गायकवाड, ॲड. श्रीनिवास बंडी, ॲड. राकेश कोंपेल्ली, ॲड. रोहन सोमा, ॲड. संदीप शेंडगे आदी युवा विधिज्ञांनी भरपूर परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी गोकुळ शुगर फॅक्टरीचे चेअरमन कपिल शिंदे, कोठारी पाईपचे   पुष्कराज कोठारी, चडचणकर ट्रॅव्हल्सचे जगदीश चडचणकर, ॲड. संतोष न्हावकर, ॲड. सौरभ जगताप यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी सोलापूर बार असो. अध्यक्ष ॲड. अमित व्ही. आळंगे, उपाध्यक्ष-ॲड. व्ही. पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज नागेश पामूल, सहसचिवा ॲड. निदा अनिस सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार सि. कटारे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठविधीज्ञ ॲड. बाळासाहेब नवले, ॲड. रोहिदास पवार, ॲड. मल्लिनाथ पाटील, ॲड. श्रीनिवास क्यातम, ॲड. राजेंद्र फताटे, ॲड. लक्ष्मण मारडकर, ॲड. विद्यावंत पांढरे, ॲड. व्यंकटेश गुंडेली, ॲड. शिवानंद फताटे, ॲड. एस. एस. पुजारी, ॲड. अजय रणशृंगारे, ॲड. रविराज सरवदे, ॲड. राजशेखर आळंगे, ॲड. विनोदकुमार दरगड, ॲड. सार्थक चिवरी, ॲड. स्मिता आळंगे, ॲड. सरोजिनी तमशेट्टी, ॲड. मेघना मलपेद्दी आदी विधिज्ञ उपस्थित होते.

सूत्रसंचालन सचिव ॲड. मनोज पामुल, आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन ॲड. विनयकुमार कटारे यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *