बाबा मिस्त्री यांनी केली उमेदवारी मागणीचा अर्ज: आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढणार
By assal solapuri ।।
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मौलाली सय्यद बाशुमिय्या (बाबा मिस्त्री) यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडक काँग्रेस पक्षाकडून लढण्यासाठी उमेदवारी मागणीचा अर्ज काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर केला.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४, २५१ दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मौलाली सय्यद बाशुमिय्या (बाबा मिस्त्री) यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज शनिवार, दि. २७ जुलै २०२४ रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन, सोलापूर येथे सादर केला.यावेळी अँड. अब्दुल पठाण, बुरहान मुल्ला, अझर शेख, किसन मेकाले, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, एन.के. क्षीरसागर, विजय शाबादी, शिरीष जाधव, सलीम मणुरे, राजू गडदे, मोहसीन फुलारी, महादेव येरनाळ, यतीश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.