60 लघुपट ऑनलाईन पद्धतीने सहभागी; उत्कृष्ट 7 लघुपटांची निवड
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात अस्तित्व मेकर्स फाऊंडेशन संस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे. लघुपट महोत्सवाच्या माध्यमातून सोलापूरच्या रसिकांना उत्कृष्ट संधी अस्तित्व मेकर्स फाऊंडेशनच्या माध्यमातून मिळाली आहे, असे गौरोद्गारगौरवोदगार डॉ. सुहासिनी शहा यांनी काढले.
अस्तित्व मेकर्स फाऊंडेशन व निर्मलकुमार फडकुले सभागृह यांच्या संयुक्त विद्यमाने लघुपट चित्रपट महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी दत्ताजी गायकवाड, श्रद्धा जवंजाळ, शशिकांत पाटील, डॉ. राजीव दबडे, डॉ. अतुल वेलणकर, विजयकुमार साळुंखे, संजय सावंत, मुख्य संयोजक बसवराज सलगर, प्रा. किरण लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
या लघुपट महोत्सवाचे हे सलग आठवे वर्ष आहे. मागील आठ वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नवोदित, यंदाच्या महोत्सवासाठी सुमारे 60 लघुपट ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. त्यापैकी उत्कृष्ट 7 लघुपटांची निवड करण्यात आली होती. ही निवड पुणे येथील दिग्दर्शक योगेश भिसे यांनी केली असून, परीक्षक म्हणून दिग्दर्शक व फिल्म एडिटर सचिन जगताप यांनी केले.
-
निवडलेले 7 उत्कृष्ट लघुपट खालीलप्रमाणे:
- नटराजा: सिंधुदुर्ग
- फ्रेम्स : मुंबई
- कूस: पुणे
- सुलतान: सातारा
- त्या भेटीनंतर: मुंबई
- साठीतला शम्मी: मुंबई
- अंदर की बात : मुंबई
निवडलेल्या उत्कृष्ट लघुपटांचे स्क्रीनिंग डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिर शेजारी, सोलापूर येथे करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष किरण लोंढे, महोत्सव अध्यक्ष सचिन जगताप, महोत्सव प्रमुख आनंद भालेराव, केतकी रानडे, ओंकार साठे, सोमनाथ लोखंडे, तिपय्या हिरेमठ, सागर देवकुळे, बाळवंत जोशी, अश्विनी मेटकरी, अस्तित्व मेकर्स फाऊंडेशनचे सर्व पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले.
