आस्था रोटी बँकेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटप

By assal solapuri :   solapur आस्था सामाजिक संस्था ( आस्था रोटी बँक) याच्यावतीने समाजातील विविध घटकांतील गोर-गरिब, वंचित, बेघर, निराधार, यांना फराळाचे वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी आनंद तालीकोटी, सुहास छंचुरे आदी.

आस्था रोटी बँकेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटप 

By assal solapuri

सोलापूर :   आषाढी एकादशी देवायनी एकादशीचे औचित्य साधून आस्था सामाजिक संस्था ( आस्था रोटी बँक) याच्यावतीने समाजातील विविध घटकांतील गोर-गरिब, वंचित, बेघर, निराधार, यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

फराळामध्ये, केळी, शेंगा लाडू, वेफर्स, शाबू खिचडी आदींचा समावेश होता. आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी,  सुहास छंचुरे, वेंदात तालिकोटी, पिंटू कस्तुरे यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले.

अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे जो मनुष्य नित्य अन्न दान  करतो त्याला संसाराचे सर्व फळे प्राप्त होतात आस्था रोटी बँकेचे ब्रीदवाक्य आहे कोठेही कधीही उपाशी राहू नये अन्न जेवणाचा मुख्य आधार असल्याचे स्पष्ट होते म्हणूनच अन्नदान म्हणजेच जीवनदान देण्यासारखे अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते म्हणूनच आस्था रोटी रोटी बँक गेल्या सहा वर्षापासून गोर,गरीब वंचित,निराधार यांच्या साठी रोज अविरतपणे अन्नदान करत असते अन्नदानाबरोबर  सामाजिक क्रीडा शैक्षणिक साहित्य वाटप करून समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो  सामाजिक बांधिलकी जोपासत आहे असे आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी म्हणाले.

यासाठी  आस्था सामाजिक संस्थेचे सचिव शिवानंद सावळगी,  उपाध्यक्ष चंद्रकांत शहा,  सल्लागार हर्षल कोठारी,  अनिल जमगे,  डॉ. महावीर शास्त्री,  सोमनाथ कोळेकर, सर्व संचालक यांचे सहकार्य लाभत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *