“गजर विठूचा..!” : स.हि.ने. प्रशालेत वारकरी दिंडी सोहळा : “गजर विठूचा” हा भक्ती गीतांचा कार्यक्रम

By assal solapuri|

सोलापूर : श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित स.हि.ने. प्रशालेत आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी सोहळा आणि “गजर विठूचा” हा भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

“गजर विठूचा” या कार्यक्रमास प्रख्यात गायक व वादक रंजन पंचवाडकर, संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ दामले, सचिवा प्रीती चिलजवार, खजिनदार सुधीर देव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता येरमाळकर, पर्यवेक्षक राठोड,  शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते. प्रास्ताविक सहशिक्षिका विद्या माने यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विठूमाऊलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथींचा परिचय रोहिणी कुलकर्णी यांनी करून दिला. संस्थेच्या सचिव प्रिती चिलजवार आणि खजिनदार  सुधीर देव यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा शाल,  पुष्पगुच्छ व सरस्वती प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.

“विठूचा गजर”  प्रशालेचे संगीत विभाग प्रमुख संतोष कोथळीकर आणि विद्यार्थी यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या भक्ती गीतांचे सादरीकरण केले.  प्रमुख अतिथी रंजन पंचवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता येरमाळकर यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संगीत विभाग प्रमुख, संगीत विद्यार्थीचमू यांचे भेटवस्तू देऊन कौतुक केले. सहशिक्षिका विद्या माने यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *