बुक बॅलन्स, दोरीवरीवरील उड्या, संगीत खुर्चीने वेधले लक्ष्य
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : अरुण प्राथमिक शाळा व कै. लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत क्रीडा सप्ताहास प्रारंभ झाला आहे. या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघमच्या अध्यक्षा माधवी अंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राथमिकचे मुख्याध्यापक मिराखोर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अंबुबाई पोतू उपस्थित होते. या क्रीडा सप्ताहांतर्गत कबड्डी, खो-खो, लंगडी, धावणे, लिंबू चमचा, बुक बॅलन्स, दोरीवरीवरील उड्या, संगीत खुर्ची अशा विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या विविध खेळातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले साहेब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.