“अपना फॅशन”चा लकी कुपन बक्षिस वितरण सोहळा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : विजयपूर रोड येथील “अपना फॅशन” ने दसरा व दिवाळीदरम्यान त्यांच्या ग्राहकांसाठी आयोजित केलेल्या लकी कुपनचा बक्षिस वितरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मोबाईलचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रथम विजेते प्रविण कांबळे (कुपन क्र. १४९) यांना आयफोन-१३ (iPhone-13) मोबाईल फोन बक्षीस म्हणून देण्यात आले. द्वितीय विजेते भीमाशंकर कोळी (कुपन क्र.२६६) यांना रेडमी नोट-१३ (red mi Note-13) हे मोबाईल फोन बक्षीस म्हणून देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे विजेते चंद्रकांत वसावा यांना व्हिवो टी-३ एलआयटीई (Vivo-T3 Lite) हे मोबाईल फोन बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया होते. यावेळी नौशाद शेख, विद्याधर शाबादी, मोहन भूमकर, मल्लिनाथ कटाप, अमरोद्दीन शेख आणि अत्तार परिवार व असंख्य ग्राहक उपस्थित होते.
सूत्रसंचालन आकांक्षा किणगी यांनी केले. यावेळी अपना फॅशनचे इब्राहिम अत्तार यांनी सांगितले की, सर्व सामान्यांच्या गरजा “अन्न, वस्त्र, निवारा” या असतात. अत्तार परिवार हा गेल्या ४० वर्षांपासून सोलापूरकरांच्या सेवेत “अपना बझार”च्या माध्यमातून अन्न व रिअल इस्टेटच्या माध्यमातून निवारा व आता “अपना फॅशन”च्या माध्यमातून वस्त्र या सुविधा पुरवत आहे. आमच्या असंख्य ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
