साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

माजी आमदार, संस्थापक अध्यक्ष उत्तमप्रकाश खंदारे यांची माहिती; मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीसह विविध ५० हून अधिक मंडळांचा सहभाग

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर : जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ५६ वी पुण्यतिथी शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी साजरा होत आहे. यानिमित्त दि.१८ जुलै रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये ५०-६० मंडळांचासहभाग राहणार्ह आहे. अशी माहिती माजी आमदार व संस्थापक अध्यक्ष उत्तमप्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक व सोलापूर शहरात दिवसभर जयंती मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर आदी उपक्रम राबविले जात आहेत. एन.पी. सामाजिक बहुउद्देशीय संस्था (बुधवार पेठ), वारणेचा वाघ संघर्ष प्रतिष्ठान, बापूजी नगर मातंग युवा प्रतिष्ठान या मंडळाच्यावतीने रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.   अण्णाभाऊंच्या पुतळयासमोर आदरांजली व गीत गायनाचा कार्यक्रम सादर केले जाणार आहे.

                                                         image source

शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी शहरातील जवळपास शंभराहून अधिक मंडळाच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. अण्णाभाऊंच्या पुतळ्यास सकाळपासून विविध मान्यवर मंडळी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पदाधिकारी, लोक प्रतिनिधी, कार्यकर्ते अभिवादन करतील. अभिवादनपर गीतगायन कार्यक्रम सादर केले जाणार आहे. सदरच्या कार्यक्रमाचे सादरीकरण सुधीर साबळे, डॉ. बाबासाहेब आंबडेकर कलाकार समिती, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब कलाकार समिती. प्रा. अनिल लोंढे, बिपीन साबळे, चवंड साठे आदी मान्यवर सादर करणार आहेत.

  • शनिवार, दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी विविध भागातील मंडळांच्यावतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधनकार कार्यक्रम सादर करणार आहेत.

  • रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता विविध मंडळांच्यावतीने आपआपल्या भागातून मिरवणूकीस प्रारंभ करतील. अंतर्गत विविध सामाजिक प्रबोधनावर देखावे, महामानवांच्या प्रतिमा विविध पथक व वाद्यसह ५० ते ६० मंडळ सहभागी होणार आहेत.

शहरातील विविध भागातून जयंती मिरवणूका अण्णाभाऊंच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्य एकमार्गी मिरवणूक निघेल. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्यावतीने व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्यावतीने मंडळाच्या पदाधिकांऱ्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे.

या पत्रकार परीषदेस अध्यक्ष शांतीलाल साबळे, प्रमुख मार्गदर्शक सल्लागार युवराज पवार, सुरेश पाटोळे, सुहास शिंदे, सतिश बगाडे, सचिव तुषार खंदारे, उपाध्यक्ष विकास डोलारे, महादेव भोसले, लखन गायकवाड, गोविंद कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *