खरीप हंगाम 2025 मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दि.३१ जुलै २०२५ अशी होती. तथापि, राज्यामध्ये गत वर्षीच्या तुलनेत कमी सहभाग, शेतकऱ्यांकडे Agristack Farmer Id नसणे, PMFBY पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार (UIDAI ) व CSC सर्व्हरवरील व्यत्यय, राज्याच्या भूमीअभिलेख पोर्टलच्या तांत्रिक/सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने दि. ०१ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि. 14 ऑगस्ट, 2025 व कर्जदार शेतकऱ्यांना दि. ३0 ऑगस्ट, 2025 पर्यंत विशेष बाब म्हणून केंद्र शासनाने मुदतवाढ दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना PMFBY पोर्टलवर स्वतः शेतकरी यांनी तसेच क्रॉप इन्शुरन्स App व सामुहिक सेवा केंद्र यांचेमार्फत योजनेत मोठया प्रमाणत सहभाग नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
