ज्ञानदीप सोसायटी को. ऑप. क्रेडिट सोसायटीचा ४६ वा वर्धापन दिन साजरा ;
यशस्वीपणे पार केला ६००० कोटींचा टप्पा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : ज्ञानदीप सोसायटी को. ऑप. क्रेडिट सोसायटीचा सोमवार, दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी वर्धापन दिन असून, त्यानिमित्त या सोसायटीच्या कार्यालयात वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली .
यावेळी उपनिबंधक डॉ.बागल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, माजी नगरसेवक जगदीश पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दीप प्रज्वलन सोसायटीचे मॅनेजर प्रमोद निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार झाला. सोसायटीचे संचालक, संस्थापक विश्वनाथ पवार, अध्यक्ष जिजाबा पवार, उपाध्यक्ष चंद्रकांत धुमाळ, सचिव चंद्रकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात ज्ञानदिप सोसायटी को. ऑप. क्रेडिट सोसायटी यशस्वीपणे वाटचाल करत आहे.
महाराष्ट्रात सहकार चळवळीत आर्थिक पायावर स्वावलंबी असलेली एक आदर्श अग्रगण्य व प्रथम क्रमांक असलेल्या ज्ञानदीपने सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या महत्वपूर्ण सहकार्यामुळे ४६ व्या वर्षात पदार्पण करत असताना ६००० कोटींचा यशस्वी टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासना कडून “सहकार भूषण” व “सहकार महर्षी” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. संस्थेस सहकार भारती नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये देशात प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यापुढे अशाच पद्धतीने आपल्या कार्याची वाटचाल सुरू राहणार असल्याचे या सोसायटीचे सोलापूर प्रतिनिधी नितीन धवन यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले .
प्रमुख अतिथी मान्यवर उपनिबंधक डॉ. बागल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार, माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी दीप ज्ञानाचा प्रकाश धनाचा या वाक्य प्रचितीप्रमाणे ही सोसायटी यशाची गरुड झेप घेत आहे. या उत्तुंग भरारीमुळे त्यांची महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरावर दाखल घेऊन “सहकार भूषण” व “सहकार महर्षी” या नावाने पुरस्कार देऊन विशेष सन्मान केला आहे, हीच या ज्ञानदीपच्या जिद्द, चिकाटी, अथक परिश्रमाची यशस्वीतेची “गुरुकिल्ली”आहे असे म्हणायला हरकत नाही असे प्रतिपादन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोसायटीचे वरिष्ठ व्यवस्थापक (आय. टी.विभाग) शशिकांत भिलारे, उपमुख्य व्यवस्थापक (लीगल विभाग) ॲड.रामचंद्र पिसे, मुख्यव्यस्थापक लक्ष्मण चव्हाण, कर्मचारी प्रतिनिधी संजय शिर्के, एकनाथ जगताप, रवींद्र केंजळे, विजय कासुर्डे, बाळासाहेब वांजळे, अनुप पवार, शुभम पवार, किरण तपकिरे, हनमंत धिवार, निवृत्ती मस्के, छाय शिंदे, दुर्गा वाघ यांच्यासह कर्मचारी, दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी अथक परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन गणेश बारसकर यांनी केले.