सोलापूर : प्रतिनिधी
गाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (Sinhgad Engineering College) मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक व्हेईकल्स विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रिसिजन कॅमशाफ्टचे (Precision Camshafts) कार्यकारी संचालक करण शाह, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, प्रिसिजन कॅमशाफ्टचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. विजय बिरादार,कार्यशाळेचे समन्वयक प्रा. अनिल कोटमाळे, प्रा. सचिन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रिसिजन कॅमशाफ्टचे कार्यकारी संचालक करण शाह म्हणाले, इलेक्ट्रिक व्हेईकल्स (Electric Vehicle) निर्मिती क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणले जात आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल्स निर्मितीमुळे प्रदूषण (Pollution) नियंत्रण होणार असून येणाऱ्या २०३० सालापर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करणे व प्रदूषणमुक्त भारत (India) ही केंद्र सरकारची (Government) योजना आहे. त्यामुळे सर्वांनी इलेक्ट्रिक व्हेईकल्सचा वापर करावा व प्रदूषण मुक्त भारत करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेईकल्स या नवीन तंत्रज्ञानाचा (Technology) स्वीकार करावा.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र व्यवहारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कौस्तुभ मंगरुळकर व प्रा. हेमंत लगदिवे यांनी केले. आभार प्रा. सचिन चव्हाण यांनी मानले.