Share Market News | विद्यार्थांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीचे बारकावे स्वत: जाणून घ्यावेत. आपल्याकडील लहान प्रमाणावरील निधी अगदी दहा रुपयापासून शेअर बाजार आणि त्याच्याशी निगडीत व्यवहारात गुंतवणूक करण्यास सुरवात करावी. देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात आपलाही सहभाग असावा.
शेअर बाजार मध्ये गुंतवणूकदाराचे सल्लागार, बँक ऑफिस, संगणक ज्ञान, टेक्नॉलॉजी, वित्तीय माहिती आदी क्षेत्रात तरुणांना करिअरच्या संधी आहेत. देशातल्या 20 मोठ्या कंपन्यानी चंद्रयान मोहिमेसाठी मदतीचा हात पुढे केला. गुंतवणुकीतून करिअरची वाटचाल करण्यासाठी कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला ते शक्य आहे. अर्थात, जगामध्ये मंदी असली तरी भारतात मात्र संधी आहे. म्हणून जगातील लोक भारताकडे आकर्षित होत आहेत. याचा लाभ आजच्या तरुण पिढीने घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. विजय ककडे यांनी केले.
वसुंधरा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्यावतीने ‘शेअर बाजार आणि त्यातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत “विद्यार्थांच्या वर्तमान व भविष्यकाळातील जीवन पद्धती, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि रोजगाराच्या संधी” याविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी डॉ. सुवर्णा सूर्यवंशी यांनी “शेअर बाजार आणि त्यातील सरलता” या विषयावर आपले विचार व्यक्त केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वगुण संपन्न होताना विविध प्रकारची व्यावसयिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी ब्रिज कोर्सेस करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. Share Market News
कार्यशाळेच्या अध्यक्षीय आढाव्यात प्राचार्या डॉ. मीना गायकवाड यांनी येणारा भविष्यकाळात अनेक आव्हाने आपल्यासमोर येत आहेत. रोजगारीचा प्रश्न अगदीच बिकट होत चालला आहे. प्रत्येक क्षेत्रात निर्माण झालेली प्रचंड स्पर्धा, मंदीचे वातावरण, जीवनविषयक वस्तूंच्या वाढत्या किंमती, सरकारची खाजगीकरणाकडे होणारी वाटचाल या सर्व बाबी विचारात घेता आजच्या तरून पिढीने स्वतःला सक्षम करावे लागेल. त्यासाठी आजची कार्यशाळा विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी उपयुक्त ठरेलं असे प्रतिपादन केले. Share Market News
कार्यशाळेचा उद्देश आणि प्रास्ताविक प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी केले. परिचय प्रा. डॉ तानाजी देशमुख यांनी करून दिला. आभार प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. बापू राऊत यांनी केले. सदर कार्यशाळेस प्राध्यपक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. Share Market News