अंथरुणाला खिळलेल्या वयोवृद्धांची सेवा बजावणारी  “शांताई” ठरतेय “आधार”

जुळे सोलापुरातील शिवगंगा नगरात शांताई फाउंडेशनमार्फत

श्रीलक्ष्मी चव्हाण समाजाभिमुख सेवेसाठी तत्पर

 by assal solapuri ||

 सोलापूर : सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगामध्ये अंथरुणाला खिळलेल्या वयोवृद्‌धाना  वृद्धांचा सांभाळ करणे हे किती जिकीरीचे, तारेवरची कसरत करण्यासारखे काम असते आणि अवघड, कठीणही असते, हे आपण सर्वज्ञात आहोत. परंतु, सध्या जुळे सोलापुरातील शिवगंगा नगरातील नव्याने सुरु झालेली शांताई फाउंडेशन  या सेवाभावी (एनजिओ)  संस्थेमार्फत अंथरुणाला खिळलेल्या वयोवृद्धांसाठी सध्या आधार ठरतेय.

शांताई फाउंडेशनने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आपल्या वृद्धाश्रम व सेवा-सुसूशा निवासी केंद्राच्या माध्यमातून  अंध, अपंग, अंथरुणाला खिळलेले वयोवृद्ध, कोमातील व्यक्‍ती, डिमेन्शिया, अल्झायमर, पॅरेलिसिस (लकवा) अशा विविध आजाराने त्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी शांताई फाउंडेशनच्या संचालिका श्रीलक्ष्मी चव्हाण या मातृसेवा आणि केअरटेकर म्हणून अहोरात्र सेवा बजावण्यासाठी तत्पर असल्याचे दिसून येत आहे.

समाजसेवा हीच मातृत्व सेवा समजून गेल्या पाच ते सहा वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ अशा अनुभवातून शांताई फाउंडेशनच्या संचालिका श्रीलक्ष्मी चव्हाण या आपल्या कुटुंबियासोबत अहोरात्र रुग्णांची सेवा करणे हे सेवाभावी कार्य करीत आहेत. मुलगा दिनेश चव्हाणसह विशाल दंडगुला, भीमराव, स्वप्ना, शेख या पाच सेवेकार्यांसोबत अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची सेवाभाबी कार्य जोपासत आहेत.

सोलापुरातील मध्यमवर्गीय, असहाय्य, अनाथ, वयो-वृद्धांना या सेवेचा लाभ घेता यावा हीच त्यांची मनिषा आणि ध्येय  आहे.  श्रीलक्ष्मी चव्हाण यांनी गेली पाच वर्ष पुण्यातील मातृसेवा या संस्थेमध्ये केअरटेकर व व्यवस्थापनाचा अनुभव घेऊन आता सोलापुरात स्वताची सेवाभावी संस्था  शांताई फाउंडेशनची स्थापना केली आहे.

अंध, अपंग, अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध, कोमातील व्यक्‍ती, डिमेन्शिया, अल्झायमर, पॅरेलिसिस यांच्या सर्व सेवेचा अनुभव घेऊन शांताई फाउंडेशनच्या माध्यमातून ही सेवा समाजातील सर्वधर्मीय स्त्री-पुरुषांसाठी उपलब्ध केली आहे.

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना अंघोळ घालणे, त्यांना  फिरवणे, जेवण-घास भरवणे, फिजिओथेरपी, वैद्यकीय सल्ला-मसलत अशा विविध समाजाभिमुख सेवा त्या बजावत आहेत.  तीन महिन्यापूर्वी सुरु केलेल्या या शांताई फाऊंडेशन संचलित वृद्धाश्रम व निवासी सेवा केंद्रात सध्या सध्या तीन (लकवा) पॅरेलिसिस झालेल्या व्यक्तींची त्या सेवा बजावत आहेत.

==========================================================================================

  • भविष्यात ५०० हून अधिक रुग्णांची सेवा बजावण्याचा मानस

  • अंथरुणाला खिळलेल्या  रुग्णांची सेवा समाजसेवा हीच मनिषा, ध्येय बाळगून गेल्या तीन महिन्यांपूर्वी  शांताई फाऊंडेशन संचलित वृद्धाश्रम व निवासी सेवा केंद्राची स्थापना केलेल्या श्रीलक्ष्मी चव्हाण यांचा भविष्यात ५०० हून अधिक रुग्णांची सेवा बजावण्याचा मानस आहे.

=======================================================================================

आर्थिक मदतीचे आवाहन..

गेल्या पाच-सहा वर्षात पुण्यात राहून विविध सामाजिक संस्था, केअर सेंटरमध्ये अंथरुणाला खिळलेल्या  रुग्णांची सेवा बजावून सोलापुरातील रुग्णांच्या सेवेत तत्पर असलेल्या श्रीलक्ष्मी चव्हाण यांनी आपल्या मुलांचा सांभाळ, देखभाल करून घरखर्च भागवून आता आपल्या अपत्यांसोबत शांताई फाऊंडेशन संचलित वृद्धाश्रम व निवासी सेवा केंद्राची स्थापना केली. गेल्या तीन महिन्यापूर्वी स्थापन केलेल्या या केंद्रात सद्या तीन तीन (लकवा) पॅरेलिसिस झालेल्या व्यक्तींची त्या सेवा बजावत आहेत. मात्र कोणाचाही आणि कोणताही आधार नसताना त्यांनी आपल्या स्वबळावर ही सेवा केंद्र सुरु केले आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीनी मदतीचा हात पुढे करावा. त्यांच्या या सेवाभावी कार्यात हातभार लावण्याची गरज आहे. अधिक माहितीसाठी संचालिका श्रीलक्ष्मी चव्हाण (८६२४८०८८९७), दिनेश चव्हाण (७७५८८४९२६६) असे आवाहन करण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *