खोट्या “मक्तेदारा”कडून बिले काढण्यासाठी खटाटोप

Solapur Municipal Corporation

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महापालिकेला (Solapur Municipal Corporation) खोटा बाँड देऊन मक्तेदारी मिळवणाऱ्या मक्तेदाराची चौकशी सुरू आहे. असे असताना पूर्वी केलेल्या कामांची बिले चौकशी पूर्ण होईपर्यंत अदा करता येत नाहीत. परंतु सदरचा ठेकेदार व त्यांच्या वडिलांकडून अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन बिले काढण्यासाठी खटाटोप सुरू आहे.
      खोटा बाँड देऊन मक्तेदारी मिळवल्याचे वृत्त पंधरा दिवसांपूर्वी सत्ताकारण न्युज नेटवर्कने उघडकीस आणले होते. यामध्ये तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या सहीचे मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधीतावर व यात सामिल अधिकारी-कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार ? याबाबत अतिरीक्त आयुक्त कारंजे यांना विचारले असता त्यांनी कागदपत्रांची तपासणी होईल, त्यानंतर यामध्ये संबंधीत मक्तेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर 420 चा गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले. यावर संबंधीत मक्तेदाराकडून पेंडींग बिले काढण्याचा प्रकार सुरू आहे. 
      बिले काढण्यासाठी त्या-त्या झोन अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन बिल फॉर्म, आयटी रिटर्न्स, कामाचे फोटो, काम पूर्णत्वाचे दाखले याबाबत अफरातफर सुरू असून अशा पध्दतीने पेंडिंग बिले काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरी सदरच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या-त्या झोनचे अधिकारी यांनी प्रस्ताव पाठवू नये, उपायुक्त तथा मुख्य लेखापाल विद्या पोळ यांनी बिले थांबवणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधीत ठेकेदाराकडून संबंधीत अधिकाऱ्यांना अडचणीत आणले जाऊ शकते.
  
   चौकशी सुरू… 
खोट्या बाँडव्दारे मक्तेदारी मिळवल्याचा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणूण दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु नगर अभियंता चलवादी हे वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांच्याकडील पदभार अवताडे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या अवताडे यांच्याकडून तत्काळ चौकशी पूर्ण होऊन अहवाल वरिष्ठांकडे सादर करून संबंधीतावर कारवाई करणे अपेक्षित आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *