मातृभूमीचे रक्षण करण्याऱ्या सैनिकांना विद्यार्थिनीनी बांधल्या राखी
by assal solapuri ||
सोलापूर : सिमेवर देशाचे संरक्षण करणारे सैनिकांमुळे आज आपण सुरक्षित आहोत, याची जाणिव प्रत्येक नागरीकाला असली पहिजे. सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावून देशातील नागरिकांचे रक्षण करत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते देशाचे बांधव आहेत. ही भावना जपत विद्यार्थ्यांनी माजी सैनिकांसमवेत राखी पौर्णिमा साजरी केली. सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयाच्यावतीने विजयपूर रोडवरील भारतीय माजी सैनिक संघटना कार्यालयात माजी सैनिकांसमावेत राखीपौर्णिमा साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत प्रा. विनिता शिवशरण, प्रा. प्रिती कोठारी उपस्थित होते. माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे, संचालिका विटाबाई, सचिव काकासाहेब काशीद, माजी सैनिक संघटनचे संचालक अशोकराव ढेपे, संचालक रावसाहेब काशीद, संचालक सुधाकर पौळ, कार्यरत असणारे मराठा बटालियनचे सैनिक प्रकाश काळे, माजी सैनिक या उपक्रमात सहभागी झाले होते. संगमेश्वर महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली, बी.बी.ए विभागातील प्रा. गौरव जुगदार, प्रा. अर्जुन चौधरी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.