Asia Cup मध्ये लोकेश राहुलला संधी देऊ नका-रवी शास्त्री

Asia Cup

Image Source 

Asia Cup लोकेश राहुल आता फिट झाला आहे आणि त्याला आशिया चषक स्पर्धेत संधी देण्यात येईल, असे म्हटले जात आहे. पण राहुलला आशिया चषकात संधी देऊ नका, असे रवी शास्त्री यांनी का म्हटले आहे, जाणून घ्या मोठं कारण…

दिल्ली : प्रतिनिधी

राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या. ज्यावर उपचार करण्यासाठी त्यांना शस्त्रक्रियेसही सामोरे जावे लागले. सध्या हे दोघेही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनाच्या कार्यक्रमाला सामोरे जात असून, ३० ऑगस्टपासून रंगणाऱ्या आशिया कपआधी हे दोघेही पूर्णपणे फिट होण्याची शक्यता आहे. ‘राहुलवर यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवली जाणार आहे अन् तो काही दिवसांपूर्वीच गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला आहे. यष्टीरक्षण म्हणजे प्रत्येक चेंडूवर बैठका काढाव्या लागतात, चपळ राहावे लागते.

दुखापतीतून आता कुठे सावरलेल्या राहुलवर एवढा ताण नको वाटतो,’ असे शास्त्री यांनी एका क्रीडा वाहिनीवरील कार्यक्रमातील चर्चेदरम्यान सांगितले. दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंना थेट भारतीय संघात संधी देण्याची घाई करता कामा नये. जसप्रीत बुमराहच्या बाबतीत ही चूक एक, दोनदा नव्हे, तर तीन वेळा केली गेली. त्याचे परिणामही आपण भोगले. बुमराह तब्बल १४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकला, असे उदाहरणही शास्त्री यांनी दिले.

Asia Cup | गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेल्या लोकेश राहुलचा आशिया कपसाठी थेट भारतीय संघात समावेश करायला नको. Asia Cup चार महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिलेल्या खेळाडूला थेट आव्हानात्मक स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर उतरवणे म्हणजे त्याच्याकडून अवाजवी अपेक्षा करण्यासारखे आहे,’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
Asia Cup | ‘राहुलऐवजी तिलकला संधी द्या’
राहुलला थेट संधी देण्यापेक्षा नव्या दमाच्या तिलक वर्माला मधल्या फळीत खेळवा, अशी सूचना रवी शास्त्री यांनी केली. अंतिम अकरातील अव्वल सात फलंदाजांमध्ये रवींद्र जडेजासह तीन डावखुरे असावेत, असा त्यांचा आग्रह आहे. ‘तिलक वर्माची कामगिरी प्रभावी आहे. मला डावखुऱ्या फलंदाजांवर लक्ष केंद्रित करायचे असेल, तर मी तिलकला नक्की संधी देईन. गेल्या तीन महिन्यांत मग ती आयपीएल असो किंवा भारतीय संघाचे सामने. तिलकने स्वतःला सिद्ध केले आहे,’ असे शास्त्री म्हणाले.
राहुलला जर आशिया चषकता संधी दिली नाही तर त्याची वर्ल्ड कपमध्ये निवड कशी करायची, हा मोठा प्रश्न बीसीसीआयपुढे असेल.
Check Also
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *