कोविडच्या भीषण काळात जीवदान देणारे डॉक्टर रुग्णांसाठी देवदूतच : जिल्हाध्यक्ष संतोष पवार
गुणगौरव पुरस्कार: २०२४
By assal solapuri ।।
सोलापूर : कोविडच्या (covid-19) काळात डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे उपचार करून देव दूताप्रमाणे अनेकांचे प्राण वाचवले. डॉक्टर हे रुग्णांसाठी देवदूतच आहेत. म्हणून या देवदूतांचा सन्मान डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष डॉ. संदीप माने, कार्याध्यक्ष महेश वसगडेकर यांनी केला. त्यांचे हे स्तुत्य उपक्रम आहे. येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संघटनेच्या ज्या कांही अडीअडचणी असतील, त्या सोडवण्याचा प्रयत्न जिल्हा समन्वयक यशवंत तात्या माने त्याचबरोबर सर्व माझ्या सहकाऱ्यांना घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (उपमुख्यमंत्री अजित पवार गट ) जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जनविश्वास सप्ताह’ अंतर्गत डॉक्टर सेलच्यावतीने आरोग्य क्षेत्रातील समाजकार्याची दखल घेऊन गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्टर व आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष गुणगौरव पुरस्कार : २०२४ देऊन राष्ट्रवादी भवन येथे गौरवण्यात आले. सुरुवातीस माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पुढील कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार झाला.
प्रास्ताविकेत डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष डॉ. संदीप माने यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. डॉ. माने म्हणाले, (covid-19) कोविडच्या भीषण काळात देवदूताप्रमाणे धावून आलेले आणि समाजामध्ये सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या आदर्शाची लोकांनी प्रेरणा घेऊन समाजोपयोगी कामे करावीत, या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह अंतर्गत गुणगौरव पुरस्काराचा उपक्रम घेण्यात आला.
डॉ. विनायक टेंभुर्णीकर म्हणाले, कोविडच्या (covid-19 ) भीषण काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिमत्त्वांना सन्मान डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष संदीप माने व कार्याध्यक्ष डॉ. महेश वसगडेकर यांनी आयोजित करून पुरस्कार पुरस्कार दिला. त्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम केले आहे. .त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक यावेळी करावसं वाटते .
डाॅ. निलरोहीत पैकी म्हणाले, गेली अनेक वर्ष आरोग्य सेवा करीत असून, कोरोनाचा भयानक काळ आपल्या पिढीने अनुभवला. खूप प्राणहानी झाली. डॉक्टरांनी जिवाचे रान करीत ती कोरोनेची लाट आटोक्यात आणली. राष्ट्रवादीकडून सन्मान होतो त्याचा आनंद होतोय.
डॉक्टर सेलच्यावतीने गुणगौरव पुरस्कार :२०२४ चे मानकरी :
निमा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. निलरोहित पैकी, डॉ.रवी गायकवाड, निमा संघटनेचे शहराध्यक्ष डॉ.रवी गायकवाड, डॉ.शिवाजी पाटील, डॉ.अनिल काळे, डॉ.प्रतीक शिवगुंडे, डॉ.विक्रम बसरगी, आरोग्य क्षेत्रातील पुरस्कर्ते हाजी पैगंबर शेख, सुशीला गायकवाड, जयकुमार चाबुकस्वार, अंकिता मेहता, प्रशांत शिंदे, अंबादास धायगुडे, भागप्पा प्रसन्न, प्रज्ञा जोशी, सागर गोरले, गजानन कोळी, बसवराज कोळी आदी मान्यवरांचा सन्मान जल्लोषपूर्ण वातावरणात झाला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी नगरसेवक नारायण माशाळकर,ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माझी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस लताताई ढेरे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी अध्यक्ष संगिता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का , प्रदेश युवक सरचिटणीस खलिल शेख, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, युवक समन्वयक महेश कुलकर्णी, संघटक दत्तात्रय बडगंची, प्रवक्ते नागेश निंबाळकर, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे ,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, मुख्य संघटक शहर उत्तर विधानसभा प्रकाश झाडबुके, दक्षिण विधानसभा अध्यक्ष प्रियाताई पवार, मध्य विधानसभा कार्याध्यक्ष शोभा गायकवाड, प्राजक्ता बागल, सोशल मिडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, पल्लवी पवार, शामराव गांगर्डे, डॉक्टर सेल विभागातील डॉ. राजीव पटनी, डॉ. उमेश कराळे , डॉ. अशोक अनपट, डॉ. निलेश खंडागळे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी, महिला नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव, प्रास्ताविक डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष डॉ. संदीप माने, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदन मुळे यांनी परिश्रम घेतले.