परळी वैजीनाथला राज्यस्तरीय कृषी महोत्सव

कृषी विभागाच्यावतीने  दि. २१  ते २५ ऑगस्टदरम्यान आयोजन  

by assal solapuri||

सोलापूर  : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दि.२१ ते २५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत बीड  जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, कॉटन मार्केट यार्ड, नाथ रोड, परळी वै.  येथे पाच दिवसीय परळी वैजीनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव-२०२४  आयोजित करण्यात आले आहे.

या कृषी महोत्सवात शेतक-यांना विविध कृषी योजना उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतक-यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय आदी बाबतचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहेत. कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट घडावी, तसेच सामान्य शेतक-यांच्या शंका- समाधानाचे निरसन करण्यात येणार आहे.  उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव, फळे, फुले व भाजीपाला महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

या महोत्सवास मुख्यमंत्री, मंत्री-महोदय, खासदार, आमदार,   लोकप्रतिनिधी व राज्यस्तरीय अधिकारी व शेतकरी उपस्थित राहणार आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू व भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *