सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा यांची माहिती; पद्मशाली सखी संघमतर्फे स्त्रियांसाठी आरोग्य उपक्रमाचे आयोजन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्यावतीने समस्त ‘स्त्री’ वर्गासाठी ‘दैनंदिन आरोग्य समस्या, कर्करोग, आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय’ याचे आयोजन रविवार, दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे. अशी माहिती सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, सचिवा रुचिरा मासम, आणि कार्याध्यक्षा सविता येदूर यांनी दिली आहे.

आजच्या घडीला स्त्रिया घरातील सर्व कामे करुन, या धावपळीत नोकरीही करत असतात. यामध्ये विशेषतः पूर्व भागातील काही महिला विड्या वळण्याचे काम करीत असतात. यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नसल्याने स्त्रियांमधील आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या समस्यांवर निदान होण्यासाठी डॉ. नम्रता गुल्लापल्ली (बिंगी) या विनामूल्य (मोफत) तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
रविवार, दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत सोलापूर शहराच्या पूर्व भागातील दत्तनगर ते पोलीस मुख्यालय (हेडक्वॉर्टर) या मार्गावरील मध्यभागी असलेल्या ‘श्री समर्थ क्लिनिक’ येथे हे शिबीर होणार आहे.
या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने स्त्रियांनी सहभागी होऊन लाभ घ्यावे, असे आवाहन सखी संघमच्या सहसचिव वनिता सुर्रम, अंजली वलसा, श्रावणी कनकट्टी, खजिनदार गीता भूदत्त, सहखजिनदार हेमा मैलारी, समन्वयिका पल्लवी संगा, ममता तलकोकूल, सल्लागार ममता मुदगंडी, मेघा इट्टम, सुलोचना माचरला, मंजुळा दुधगुंडी, संगिता सिद्राल, सुप्रिया मासम, रजनी दुस्सा, पुर्णिमा कंदीकटला, भाग्यलक्ष्मी तुम्मा यांनी केले आहे.
