महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे तर सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी

सोलापूर : प्रतिनिधी

महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे, सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी तर खजिनदार पदी चंद्रकांत मिराखोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

महापालिका पत्रकार संघाची वार्षिक सभा महापालिकेतील पत्रकार कक्षात गुरुवारी दुपारी 12 वाजता मावळते अध्यक्ष राकेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या निवडी करण्यात आल्या. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या असून यामध्ये उपाध्यक्ष – अजित उंब्रजकर, आफताब शेख, चिटणीस – विशाल भांगे, रोहन श्रीराम, संदिप  वाडेकर, कार्यकारणी सदस्य – आप्पासाहेब पाटील, सलमान पिरजादे, विकास कस्तुरे, अभिषेक अदेप्पा, यशवंत गुरव, बालाजी चिटमिल, प्रभू वारशेट्टी, अनिल कांबळे, आयुब कागदी, सल्लागार प्रशांत जोशी, प्रशांत माने, समाधान वाघमोडे, सादिक इनामदार आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याचा मानस नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

One thought on “महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे तर सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *