आता लाखाचे बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी

“My Gov” वर आयोजित ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा

  • पहिला राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त तीन दिवसीय मल्टीमिडिया प्रदर्शन;सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश

  • ‘चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे: भारताची अंतराळ गाथा’ यावर्षीची संकल्पना

  • सोलापूर विज्ञान केंद्र, केंद्रीय संचार ब्युरोचा विशेष उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा

by assal solapuri ||

सोलापूर : केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर विज्ञान केंद्रातील बहुउदेशीय सभागृहामध्ये दि. २२ ते २४ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवसानिमित मल्टीमिडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, प्र. कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यापीठातील विभाग प्रमुख यांची उपस्थिती असणार आहे.

सदर प्रदर्शनामध्ये चांद्रयान-३ मोहिमेची निर्मिती, प्रक्षेपण, चंद्रावर उतरलेले विक्रम लँडर आणि ओडी`रोव्हर प्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान यांचे दुर्मिळ फोटो, पंतप्रधान यांचे भाषण, संपूर्ण मोहिमेचे ऑडीओ व व्हिडीओ आणि सेल्फी विथ चांद्रयान -३ मोहीम आदींची माहिती असणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते ५.३० वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

============================================================================================

  • चांद्रयान-३ मोहीम, आपल्या अंतराळ संशोधन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा, मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय अभिमानाने स्वीकारण्यात आला. विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले, त्याला ‘शिवशक्ती’ पॉइंट (सतीओ शिवशक्ती) म्हणून ओळखले जाते. हा आपल्या सर्वासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारे भारत चौथे राष्ट्र बनल्यानंतर आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला. या घटनेच्या स्मरणार्थ दि. २३ ऑगस्ट हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून घोषीत करण्यात आला आहे. यावर्षी भारत आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस  “चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे: भारताची अंतराळ गाथा” या संकल्पनासह अभिमानाने साजरा करणार आहे. याचे औचित्य साधून केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर विज्ञान केंद्रातील बहुउदेशीय सभागृहामध्ये दि. २२ ते २४ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस निमित्त मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.

============================================================================

  • या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी अंतराळ तंत्रज्ञानावर त्यांच्या आवडीचे प्रदर्शन सादर करण्यासाठी https://tinyurl.com/ExiSpaceDay  या लिंकवर नाव नोंदणी करावे.च ऑन-द-स्पॉट प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी https://tinyurl.com/QuizSSC या लिंकवर नाव नोंदणी करावे, असे आवाहन केंद्राचे संग्रहालय अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल दास एम. यांनी केले आहे.  
  • —————————————————————————————————————————————————-
  •  याव्यतिरिक्त My gov वर एक रोमांचक ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेची अंतिम तारीख दि. १३ सप्टेंबर २०२४ आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुले आहे. विजेत्यांसाठी पहिले पारितोषिक १ लाख रुपये, दुसरे बक्षीस ७५ हजार रुपये, तिसरे बक्षिक५० हजार रुपयाचे आहे. याव्यतिरिक्त प्रोत्साहनपर १०० विजेत्यांना २ हजार रुपये आणि २०० विजेत्यांना १ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.  टॉपटेनमधील विजेत्यांना इस्रोला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
  • —————————————————————————————————————————————————
  •   विज्ञान प्रदर्शन आणि ऑन-द-स्पॉट प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी सहभाग प्रमाणपत्र आणि विशेष रोख बक्षिसे दिली जाणार आहे. प्रदर्शनासोबतच विज्ञान केंद्रदेखील बघता येणार आहे. यशस्वी चांद्रयान-३ मोहिमेचे साक्षीदार बनण्यासाठी आणि पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस संस्मरणीय करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विज्ञानप्रेमी, संशोधक, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावे, असे आवाहन सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *