शैव -वैष्णवांचा मिलाप म्हणजे गहिनीनाथ महाराज औसेकर : शिवरत्न शेटे
By assal solapuri||
सोलापूर : पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह -अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणजे शैव – वैष्णवांचा मिलाप आहे. त्यांच्या रूपाने एक चालते – बोलतो जंगम विद्यापीठ आपल्याला अनुभवाला मिळत असल्याचे मत शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी व्यक्त केले. डॉ. निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे जिल्हा माजी सैनिक संघटनेच्यावतीने ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सैनिक मित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. शेटे हे बोलत होते.
यावेळी भारतीय माजी सैनिक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सिनियर उपाध्यक्ष तसेच जनरल कौशिल मेम्बर अरुणकुमार तळीखेडे आणि धाराशिव जिल्हा अध्यक्ष शाहजी चालुक्य, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, सर्व संचालक मंडळ सोलापूर, तालुका अध्यक्ष अक्रूर शिंदे, बाळासाहेब भोसले, अकलकोट, माढा तालुका प्रतिनिधी, माजी सैनिक, , माजी सैनिक, चार प्रशाळेचे विद्यार्थी, शिक्षक, वीर माता, वीर पत्नी आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीमेवर सैनिक लढतात म्हणून आपण घरामध्ये निवांत झोपलेला असतो.त्या सैनिकांना आपण सलाम करणे गरजेचे असते. विठ्ठल रुक्मिणी समितीच्यावतीने सैनिकांचा सन्मान म्हणून त्याला डायरेक्ट विठ्ठल – रुक्मिणी दर्शन पासेस देण्याची सुविधा आपण उपलब्ध करून देत असल्याचे ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.