एकी हेच बळ.. संधी देऊ सक्षम नेतृत्वाला…साथ देऊ महादेव कोगनुरेंना!

महादेव कोगनुरे यांच्या  जनता दरबारातून  एकीचे सूर; आगामी निवडणुकीत समाजसेवक महादेव कोगनुरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा महिला-युवक-युवती अन जनतेचा निर्धार

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षांकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले महादेव कोगनुरे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून जनता दरबार सुरू केला आहे. त्याला जनतेकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता उपस्थित राहून आपले प्रश्न, समस्या आणि गाऱ्हाणे  मांडतात. याला सामान्य महिला, युवा-युवती, सर्व सामान्य शेतकरी, मजूर वर्ग, शहरातील नागरिक यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, दक्षिण सोलापूर मतदारसंघातून कार्यकर्ता रिचार्ज झाला असून, महादेव कोगनुरे यांना विजयपथावर घेवून जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

महादेव कोगनुरे हे सामाजिक बांधिलकीतून अनेकांना आर्थिक मदतदेखील मोठ्या प्रमाणावर करीत असतात. जळीतग्रस्त, नैसर्गिक आपत्ती, शैक्षणिक मदत, वयोवृद्ध, ज्येष्ठांना देवदर्शन, निराधारांना दररोज टिफीन देवून आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यामुळेच महादेव कोगनुरे सामान्य जनतेला आधार वाटतात. म्हणूनच दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सर्व घटकातील जनतेकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.

 महादेव कोगनुरे यांनी केलेल्या सामाजिक कांमाची चर्चा करताना काना-कोपऱ्यात दिसून येत आहे. याप्रसंगी महादेव कोगनुरे यांनी केलेल्या कामांची पावती आमदारकीच्या रूपाने त्यांना मिळण्याची वेळ आता आल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. जनता दरबाराचा परिणाम मतदारांवर होताना दिसत आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर मतदार संघात संपूर्ण वातावरण महादेव कोगनुरे यांच्यासाठी पोषक बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *