लोकमंगल कॉलेजमध्ये राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा

वडाळ्यात ३० जिल्ह्यातील ५०० खेळाडू, पंच, प्रशिक्षकांच्या उपस्थितीत रंगणार थरार;

दि. २५  ऑगस्ट ते दि २८ ऑगस्टदरम्यान आयोजन

by assal solapuri ||

सोलापूर : वडाळ्यातील लोकमंगल कॉलेजमध्ये आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ३० जिल्ह्यातील ५०० खेळाडू, पंच, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार आहे. सोलापूर महानगरपालिका, जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन व लोकमंगल कॉलेज यांच्या संयुक्‍त विद्यमाने व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने  ३० वी सिनियर राज्यस्तरीय  पुरुषांची सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा वडाळ्यातील लोकमंगल  कॉलेजमध्ये दि. २५  ऑगस्ट ते दि २८  ऑगस्टदरम्यान आयोजन  करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे  उद्घाटन दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार सुभाष बापू देशमुख हे राहणार आहेत. यावेळी  संस्थाध्यक्ष रोहन देशमुख, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, राज्य सचिव प्रदीप तळवेलकर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी वडाळ्यातील लोकमंगल कॉलेजमध्ये दोन मैदाने तयार करण्यात आलेली आहेत. या खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था लोकमंगल कॉलेजमध्ये केलेली आहे . या स्पर्धा साखळी व बाद या पद्धतीने होणार आहेत.  या स्पर्धा सकाळी आठ वाजता सुरू  होऊनसायंकाळी सहापर्यंत चालतील.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण   जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार सुभाष बापू देशमुख असणार आहेत. संस्थाध्यक्ष रोहन देशमुख, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, राज्य सचिव प्रदीप तळवेलकर  उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन व नियोजन संघटनेचे उपाध्यक्ष संतोष गवळी, सचिव संतोष खेडे, कोकाटे, मारुती घोडके, गंगाराम घोडके, प्रशांत राणे, श्रीधर गायकवाड, प्रबुध्द चिंचोलीकर, प्रशांत कदम, शिवाजी वसपटे, राहुल अन्यापनवर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *