“जल्लोष लोककले”चा बालकलावंतांसाठी पर्वणी: सीमा यलगुलवार यांची माहिती; बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम

“जल्लोष लोककले”चा बालकलावंतांसाठी पर्वणी: सीमा यलगुलवार यांची माहिती; बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम

By assal solapuri ।।
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था बालरंगभूमी परिषद मुंबई, यांच्या वतीने ऑगस्ट-सप्टेंबर२०२४ या महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित “जल्लोष लोककले” हा बालकलावंतांचा महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूरचे अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाचे संयोजन बालरंगभूमी परिषद, सोलापूर जिल्हा शाखा करीत आहे. बालरंगभूमी परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रात बालकांच्या कला गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था आहे. ही संस्था बाल वयातील तसेच किशोर प्रमुख कार्यवाह व कुमार वयातील मुलांमधील नाट्य,अभिनय, गीत-गायन, नृत्य, काव्य या व इतर अशा अनेक कलागुणांना अमला यण प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण शिबीर व स्पर्धांचे आयोजन करीत असते. याचाच एक भाग म्हणून बालकलावंतांना महाराष्ट्रातील लोककलावंतांची ओळख व्हावी यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ कोषाध्यक्ष या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष लोककलेचा या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लोककला प्रकारांची माहिती मुलांना व्हावी, या कलाप्रकारांचा आनंद त्यांना घेता यावा तसेच लोककलांचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने लोककले विषयी माहिती देणारी कार्यशाळा व महोत्सव असे दोन सहकार्यवाह विभागात हा कार्यक्रम होणार आहे.

एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर : 
महाराष्ट्रातील विविध लोक प्रकारांची माहिती आत्ताच्या पिढीला, विशेषता बाल कलाकारांना व्हावी, या हेतूने बालरंगभूमी परिषदेने वय वर्षे ६ ते १५ या वयोगटातील बालकलाकारांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. सोलापूर शहर ब जिल्ह्यासाठी दि.३ ऑगस्ट२०२४ रोजी तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला,विकास नगर, होटगी रोड,सोलापूर येथे तर मंगळवेढा परिसरातील कलाकारांसाठी दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी इंग्लीश स्कूल, मंगळवेढा येथे, पंढरपूर व परिसरातील कलाकारांसाठी १० ऑगस्ट २०२४ रोजी कर्मयोगी सभागृह, खवा बाजार, पंढरपूर येथे दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या बालकलावंतांसाठी व त्यांच्यासोबत येणाऱ्या शिक्षकांसाठी अल्पोहाराची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

जल्लोष लोककलेचा महोत्सव :
दि. ३१ ऑगस्ट व दि. १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिर येथे भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव केवळ महाराष्ट्रातील लोककला प्रकारातील गीत, नृत्य व वाद्य यावर आधारित असणार आहे. वय वर्ष ६ ते १५ वयोगटातील मुला-मुली यामध्ये सहभागी होऊ शकतात. या महोत्सवात शालेय संस्था, मान्यताप्राप्त नृत्य, संगीत संस्था सहभागी होऊ शकतात. एकल कला प्रकारांच्या सादरीकरणासाठी ४ मिनिटांची वेळ असणार तर समूह लोककला प्रकारांसाठी ८ मिनिटांची वेळ असणार आहे. सादरीकरणासाठी ठरवलेल्या वेळेव्यतिरिक्त जास्तीचा वेळ घेतल्यास त्या कलाकारांची वा संधाची अनामत रक्‍कम परत मिळणार नाही. पुरस्कारासाठी सादरीकरणाचा विचार केला जाणार नाही. अनामत उपाध्यक्ष रक्‍कम भरुन सादरीकरण केले गेले नाही तर अनामत रक्‍कम परत मिळणार नाही. समूह / सांघिक सादरीकरण करणाऱ्या संघात किमान १० बालकलाकार असणे आवश्यक आहे.कार्यक्रमस्थळी सर्व संघाना व एकल कलाकारांना स्वखर्चाने यायचे आहे. रंगभूषा, वेषभूषा संघाने स्वखचर्चाने करावयाची आहे.

सांघिक सादरीकरणासाठी कोणत्याही संस्थेस जास्तीत जास्त दोन प्रवेशिका दाखल करता येतील. प्रमुख कार्यवाह प्रत्येक संघात वेगळी मुले हवीत, समान नकोत. प्रवेश अर्ज, निर्धारित फॉर्म’ मध्ये भरुन संस्थेच्या लेटरहेड सोबत संस्थेच्या संचालक अथवा प्रमुखांच्या सही स्टॅम्पनिशी जिल्हा शाखेत प्रत्यक्ष सादर करावे. अनामत रक्‍कम जिल्हा शाखेच्या बँक अकाउंटवर भरणे आवश्यक आहे. अनामत रक्‍कम सहभागी संस्थेला परत करताना कोषाध्यक्ष सहभागी संघ/संस्थेच्या बँक अकाऊंटवर जमा करण्यात येईल.लोककला प्रकार सादर करतेवेळी कला प्रकाराशी साजेशी वेषभूषा असावी. एकल व समुह लोकनृत्यासाठी तसेच एकल गायनासाठी ध्वनिमुद्रित / रेकॉर्ड (साउंड ट्रॅक) लोकगीत वापरता सहकार्ववाह येईल. परंतु प्रत्येक्ष वाद्यवृंद असल्यास त्या संघास वा एकल कलाकरास जादाचे ५ गुण मिळतील.

सहभागी कलावंतांना मोफत भोजन व्यवस्था :
जल्लोष लोककलांचा या दोन दिवसीय महोत्सवात सहभागी झालेल्या बालकलावंतांना व त्यांच्यासोबत येणाऱ्या शिक्षकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था बालरंगभूमी परिषद, सोलापूर जिल्हा शाखा यांच्यावतीने करण्यात येणार आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व महोत्सवातील प्रवेशासंबधी अधिक माहितीसाठी सुभाष माने, सोलापूर (मो.8149831344) , वैभव जोशी, पंढरपूर (मो.9822220098) व तेजस्विनी कदम , मंगळवेढा (मो.9922807955) यांच्याशी संपर्क साधावा. तरी सदर कार्यशाळेस व जल्लोष लोककलांचा महोत्सव या दोन्ही उपक्रमात सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुसंख्य बालकलावंतांनी सहभाग घेऊन या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचा व महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद, सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस अर्चना अडसूळ, अमृता भानूप, शांता बेळमपूरकर, किरण फडके, वैशाली शहापुरे, सुमीत फुलमामडी, मिलिंद ठोंबरे, सुभाष काळे, पदमाकर कुलकर्णी, बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, सल्लागार मंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *