जागतिक अवयवदान दिनानिमित्त सोलापुरात महारॅलीचे आयोजन

जागतिक अवयवदान दिनानिमित्त सोलापुरात महारॅलीचे आयोजन

By assal solapuri।।

सोलापूर : अवयवदानाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने जागतिक अवयवदान दिनानिमित्त दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. वैशंप्रायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या अवयवदान जनजागृती महारॅली डॉ. वैशंप्रायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कुंभारी, अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखा यांच्या संयुक्‍त विद्यमानाने दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी ‘ सहभागी होणार आहेत. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, होमिओपॅथिक महाविद्यालय, डेंटल कॉलेज, नर्सिंग महाविद्यालय, शहरातील इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कॅडेट सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये अवयवदानाच्या निमित्ताने लोकप्रबोधन करण्यासाठी पथनाट्य पोस्टर्स यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

सदर जनजागरण दिंडी (रॅली) डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथून प्रारंभ होणार आहे. ही रॅली पोटफाडी चौक- सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी-कुंभार गल्ली -जगदंबा चौक -लष्कर -सात रस्ता- संगमेश्वर कॉलेज मार्गे – गरुड बंगला -रोटरी बगीचा मार्ग -मगतसिंग मार्केट मार्ग यानंतर अश्विनी सहकारी रुग्णालय येथे विसर्जित होईल. अवयवदान सप्ताहनिमित्त महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी घोष वाक्य स्पर्धा, निबंध, रांगोळी, वक्तृत्व, भित्तिपत्रक स्पर्धा इत्यादी कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत. तरी सदर उपक्रमात सर्व नागरिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनी, शासकीय निमशासकीय संस्था, सामाजिक संस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या पुण्यकर्मात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे.
तसेच अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कुंभारीचे अधिष्ठाता डॉ. सुहास कुलकर्णी, अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत औरंगाबादकर, मानवी अवयवदान समिती तथा विभाग प्रमुख, औषधवैद्यकशास्र विभागाचे अध्यक्ष डॉ. व्ही.एन.धडके, समन्वयक तथा शल्य चिकित्साशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.औदुंबर मस्के, छ.शि.म.सर्वो.रुग्णालय सोलापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संपत्ती तोडकर, फॅमिली प्लॅनिंग शिक्षण ऑफ इंडिया, सोलापूर शाखा अध्यक्ष डॉ. एन.बी.तेली यांनीही आवाहन केले आहे.
या पत्रकार परिषदेस संयोजक तथा अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक अशोक लामतुरे, डॉ. संजीव ठाकूर, डॉ.विठ्ठल धडके, डॉ.प्रकाश महानवर, डॉ.औदुंबर मस्के, डॉ.संतोष हराळकर, डॉ.अभिजीत जगताप, डॉ. श्रीकांत येळेगावकर आदी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *